शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली स्मार्ट करण्याचे लक्ष्य

By admin | Updated: November 11, 2016 02:56 IST

कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाचा पदभार वर्षभरापूर्वी हाती घेतला. तेव्हा राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. त्यावर मात

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाचा पदभार वर्षभरापूर्वी हाती घेतला. तेव्हा राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. त्यावर मात करत मागील वर्षभरात शहरातील नागरिकांच्या हिताची व शहर विकासाची अनेक कामे मार्गी लावली, असा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गुरुवारी येथे केला.महापौरपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त देवळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. देवळेकर यांनी सांगितले की, ‘महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती नव्हती. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा सत्तेसाठी युती झाली. त्यामुळे मला महापौरपदाचा मान मिळाला. महापौरपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला होता. महापालिकेतील एलबीटी कर रद्द झाला होता. महापालिकेस अस्वच्छ शहराचा दर्जा केंद्राच्या समितीने दिला होता. या प्रतिकूल परिस्थितीत महापौरपदाचा कारभार हाती घेतला. महापालिकेचास्मार्ट सिटीच्या यादीत नंबर आणण्यासाठी स्मार्ट सिटीची शिखर परिषद घेतली. महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर वाहतूकमुक्त केला जाणार आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा स्कायवॉक लवकर नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘शहराचा खाडीकिनारा सुभोभित करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. हे कामही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेत सिटी पार्कचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी निविदा मागवली आहे. तिला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी दोन प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक धोरण मंजूर करण्यात आले आहे. कल्याण दुर्गाडी सहापदरी पूल आणि मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली हा खाडीपूल मंजूर झाला आहे. त्याचे विकासकाम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू केले आहे. ८०० कोटी खर्चाचा रिंगरूट तयार केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे व कल्याण-शीळ एलिव्हेटेड रस्ता आणि कल्याण ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार आहे. कल्याण सर्व वाहतुकीच्या साधनांशी जोडले जाणार आहे. शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी फेरीवाला धोरण ठरवले जाणार आहे. रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. अर्धवट विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. २४ तास पाणीपुरवठा योजना महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी दोन प्रभाग क्षेत्रांत सुरू करण्यात येणार आहे. कल्याणमधील एक व डोंबिवलीतील एक प्रभाग क्षेत्राची २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी निवड केली जाणार आहे. २७ गावांत रस्ते विकास करण्यात येत आहे. नागरिकांना जास्तीतजास्त वेळ दिला आहे.