शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रोजीरोटी हिसकवाल तर रस्त्यावर उतरू!

By admin | Updated: January 30, 2016 02:22 IST

स्मार्ट सिटीच्या नावाखाली फेरीवाल्यांची रोजी-रोटी हिसकवाल तर आम्ही गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा कष्टकरी हॉकर्स युनियनने दिला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई

डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या नावाखाली फेरीवाल्यांची रोजी-रोटी हिसकवाल तर आम्ही गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा कष्टकरी हॉकर्स युनियनने दिला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी मोठ्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून दाखवावा, असे आव्हानही दिले.बाजीप्रभू चौकालगतच्या चिमणी गल्लीतील बाजारपेठेत फेरीवाल्यांची शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. त्यामध्ये फेरीवाल्यांचे नेते म्हणाले की, केडीएमसीचे आयुक्त ई.रवींद्रन यांच्या चांगल्या कामांना आमच्या नक्कीच शुभेच्छा आहेत. परंतु त्यांनी कष्टकरी फेरीवाल्यांचा विचार करावा, तो न केल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल.त्यानंतरच्या परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागेल. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी कसे आहेत याबाबत आम्हाला जाहीरपणे बोलायला लावू नका, असे सूचक भाष्य नेत्यांनी करताच उपस्थितांनी त्याला दाद दिली.प्रशासनावर टीकास्र संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून फेरीवाल्यांना अपमानास्पद वागणूक मिळते.देशात अडीच कोटींच्या आसपास फेरीवाले आहेत. त्यांच्यावर १० कोटी नागरिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनावळे, सल्लागार प्रशांत सरखोत यांच्यासह दीपक गावडे, सूर्यकांत भाऊ पाटील, थेटे बाई, शानीबाई माने, बाळाराम भोसले आणि अष्टपाल कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.