शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल फोन टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:48 IST

पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल फोन टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी दिली आहे.

पेल्हार गावातील पेल्हार डॅम जवळ असलेल्या इंन्डस कंपनीचे मोबाईल फोन टॉवरच्या ५० हजार रुपये किंमतीच्या २४ बॅटऱ्या चोरट्यांने २३ नोव्हेंबरला पहाटे चोरी केल्या होत्या. २९ नोव्हेंबरला फिल्ड ऑफिसर अनुराग रामदिन शर्मा (२२) यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात मोबाईल फोन टॉवरच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याने गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पथक यांना चोरी करणाऱ्या आरोपीचा छडा लावुन जेरबंद करण्यासाठी आदेश दिले होते.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाघचौरे, पोलीस उप निरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने तपास करुन गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप बोलेरो गाडीबाबत अधिक माहिती प्राप्त केली. त्यानुसार आरोपींची माहिती घेऊन आरोपी हे एआरसी कंपनीमध्ये (मोबाईल फोन टॉवर संबधीत) नोकरी करीत असल्याचे समजले. पेल्हार पोलिसांनी औरंगजेब सरवर अन्सारी (१९), परवेज गुलाम रसुल शहा (२४) आणि रफिक अमिनसाब शेख (३८) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीपसह ४ बॅटऱ्या व ४९ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच मांडवी येथील दाखल गुन्ह्यातील ५२ हजारांच्या १३ बॅटऱ्या हस्तगत करुन २ गुन्हे उघडकीस आणले. पेल्हार पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ६ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,  पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाघचौरे, पो उपनिरी तुकाराम भोपळे, सफौ योगेश देशमुख, पोहवा तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, अभिजीत नेवारे, रवि वानखेडे, अशोक परजणे, अनिल वाघमारे, वसिम शेख, अमोल मस्से यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mobile phone tower battery theft gang arrested in Nalasopara.

Web Summary : Police arrested a gang stealing mobile tower batteries in Nalasopara. The thieves stole batteries worth ₹50,000. Police recovered stolen goods worth ₹6.12 lakh, including a vehicle.
टॅग्स :nalasopara-acनालासोपारा