शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्रिणीने दिला दगा, तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 01:46 IST

अंगावर सोने बाळगल्याने दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने अटक केली आहे.

डोंबिवली : अंगावर सोने बाळगल्याने दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने अटक केली आहे. त्यामुळे सुटका करण्यासाठी सीमा शुल्क भरण्याचा बहाणा करत फेसबुकवरील मैत्रिणीने एका ६८ वर्षांच्या वृद्धाला ६३ हजारांचा गंडा घातल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी या वृद्धाने दागिनेही गहाण ठेवले.पश्चिमेतील कैलासनगर परिसरातील नरेंद्र देसाई (६८) यांची फेसबुकद्वारे नॅन्सी विल्यम हिच्याशी ओळख झाली होती. ब्रिटिश एअरलाइन्सने दिल्ली विमानतळावर आल्याचा मेसेज विल्यमने मागील महिन्यात फेसबुकवर देसाई यांना पाठवला. अंगावर २१० ग्रॅम दागिने बाळगल्याने दिल्ली विमानतळावर जाधव नावाच्या महिला इमिग्रेशन आॅफिसरने अटक केल्याची बतावणी विल्यमने केली.तसेच, अटक केल्यानंतर सोडविण्यासाठी सोन्याचे सीमा शुल्क भरण्यास सांगितल्याचेही विल्यम हिने देसाई यांना सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देसाई यांनी सोन्याचे दुकान असलेल्या आपल्या मित्राकडे आपले दागिने गहाण ठेवले. त्यानंतर, विल्यमने सांगितल्यानुसार नरेंद्र देसाई यांनी सीमा शर्मानावाच्या महिलेच्या खात्यावर आॅनलाइनद्वारे ६३ हजार रुपये पाठवले.तसेच, जाधव हिच्याशी संपर्क साधून सीमा शुल्क भरल्याची पावती पाठविण्यास सांगितले. बराच कालावधी उलटूनही जाधव हिने पावती पाठवली नाही. त्यामुळे जाधव हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाºया देसाई यांना तिचामोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले.आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेल्या देसाई यांनी मंगळवारी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विल्यम, जाधव आणि सीमाविरोधात गुन्हा दाखल के ला आहे.

टॅग्स :Facebookफेसबुक