शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

साडेसोळा लाखांचा कौल निर्णायक

By admin | Updated: October 10, 2014 01:49 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार

दिपक मोहिते, वसई१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार आहेत. यापैकी ८ लाख ७३ हजार ८३० पुरूष व ७ लाख ८७ हजार २०६ महिला मतदार आहेत. तर इतर मतदारांची संख्या ८६ इतकी आहे. सदर निवडणुक शांततेत पार पडावी याकरीता निवडणुक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.यंदाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदार नालासोपारा येथे आहेत. या मतदारसंघात एकुण ३ लाख ९६ हजार १९१ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख १८ हजार १८५ पुरूष तर महिला मतदारांची संख्या १ लाख ७७ हजार ९६२ इतकी आहे. या मतदारसंघात इतर मतदारांची संख्याही अन्य मतदारसंघातील मतदारांपेक्षा सर्वाधिक आहे. येथे ४४ इतर मतदार मतदान करतील. वसई येथे एकुण मतदार २ लाख ९० हजार ९१४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५० हजार ६११ पुरूष तर १ लाख ४० हजार ३०१ महिला व इतर २ मतदार आहेत. पालघर येथे २ लाख ४१ हजार ४४ मतदार असून १ लाख २३ हजार ९९४ पुरूष व १ लाख १७ हजार ४३ महिला मतदार आहेत. येथे इतर मतदारांची संख्या ७ इतकी आहे. डहाणू येथे एकुण २ लाख ३४ हजार १६२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. त्यापैकी १ लाख १८ हजार ८९१ तर १ लाख १५ हजार २६७ मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या ४ इतकी आहे. विक्रमगड येथे २ लाख ४६ हजार ४३१ मतदार असून १ लाख २५ हजार ७१० पुरूष तर १ लाख २० हजार ७२१ मतदार महिला आहेत. येथे एकही मतदार इतर नाहीत. बोईसर मतदारसंघात २ लाख ५२ हजार ३८० मतदार असून १ लाख ३६ हजार ४३९ पुरूष तर १ लाख ५० हजार ९१२ महिला मतदार आपला हक्क बजावतील. येथे एकुण २९ इतर मतदार आहेत.६ मतदार संघापैकी बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड हे ४ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. तर वसई व नालासोपारा हे २ मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुले आहेत. या सहाही मतदारसंघात विविध राजकीय पक्षामध्ये ५८ उमेदवार आपले नशिब आजमावीत आहेत. १२८ विक्रमगड - १२, १२९ डहाणू - १२, १३० पालघर - ८, १३१ बोईसर - १०, १३२ नालासोपारा - ८, १३३ वसई - ८ असे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. १५ आॅक्टोबरला चित्र स्पष्ट होणार आहे.