शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad : अभियंता मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:48 IST

Jitendra Awhad News : आव्हाड यांनाही या प्रकरणात आरोपी केले जावे तसेच संबंधित सुरक्षा रक्षक पोलिसांचे निलंबन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाई१३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभियंता अनंत करमुसे यांना मारहाण झाल्याप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षातील भाजपचे नेते आक्रमक पवित्र्यात असतांनाच वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भाजपने मात्र, आव्हाड यांनाही या प्रकरणात आरोपी केले जावे तसेच संबंधित सुरक्षा रक्षक पोलिसांचे निलंबन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.च्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या पाचही जणांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.करमुसे यांना आव्हाड त्यांच्या घोडबंदर येथील निवासस्थानातून चौघा पोलिसांनी ५ एप्रिल रोजी नेले होते. त्यानंतर त्यांना फेसबुकवर पोस्ट का टाकलीस, अशी विचारणा करीत आव्हाड यांच्या बंगल्यावर १५ ते २० जणांनी जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले होते. उपचारानंतर करमुसे यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी या पाच जणांना अटक केली. आरोपींची ओळखपरेड बाकी असल्यामुळे त्यांची नावे उघड करण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शविली. दरम्यान, आव्हाड यांच्याकडे नियुक्तीला असलेले सुरक्षा रक्षक पोलीस फिर्यादी करमुसे यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांचा या मारहाणीमध्ये सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याचे वागळे इस्टेट परिमंडळांचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले. या संबंधित सीसीटीव्ही चित्रणाचीही पडताळणी सुरु असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेArrestअटकPoliticsराजकारणBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड