शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या श्वासापर्यंत रसिकांचे मनोरंजन करणार

By admin | Updated: February 23, 2017 05:44 IST

संपूर्ण महाराष्ट्र माझे मायबाप आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून रसिकांनी भरभरून

बदलापूर : संपूर्ण महाराष्ट्र माझे मायबाप आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून रसिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. म्हणूनच, अखेरच्या श्वासापर्यंत श्रोत्यांचे मनापासून मनोरंजन करत राहणार, असे उद््गार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी काढले. पाच दिवस सुरू असलेल्या ‘बदलापूर महोत्सवा’ची सांगता ‘एव्हरग्रीन सचिन’ या सचिन यांच्याच कार्यक्रमाने झाली. शिवसेना शहर शाखा बदलापूर आणि शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने उल्हास नदीच्या चौपाटीवर ‘बदलापूर महोत्सव’ सुरू होता. सचिन यांच्या ‘एव्हरग्रीन सचिन शो’ने सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला. ज्येष्ठ संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या आठवणी सांगून त्यांचे ‘बडे अच्छे लगते है’ हे गीत सचिन यांनी सादर केले. तसेच मन्नाडे यांची ‘लागा चुनरी मी दाग’ ही गाणी सादर केली. ज्येष्ठ पार्श्वगायक किशोरकुमार यांची आठवण सांगताना सचिन म्हणाले, माझ्या पहिल्याच भेटीत किशोरदा आणि पंचमदा म्हणाले होते, तुला जर गायक व्हायचे असेल, तर गाताना कोणतीही कसर आवाजात ठेवू नकोस. मनापासून गा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचा सल्ला आजही मला उपयोगी पडत आहे. आज मी गायक नसलो, तरीही त्यांची गाणी सादर करू शकतो, असे ते म्हणाले. पंचमदा व किशोरदा यांच्यासारखे गुरू मला लहान वयात भेटले, हे मी माझे भाग्य समजतो, असे सचिन यांनी सांगितले. या दोघांची गाणी पिढ्यान्पिढ्या अजरामर राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)इजिप्तच्या कलाकाराने जिंकली मनेच्बदलापूर महोत्सव सोमवारी गाजविला तो परदेशी कलाकारांनी. अमेरिकन नृत्यकलाकारांसोबतच इजिप्तच्या कलाकारांनी बदलापूरकरांची मने जिंकली. हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी बदलापूरकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर देशी गाण्यावर परदेशी नृत्य असा अनोखा मिलाप बदलापूरकरांना अनुभवता आला. च्१७ फेब्रुवारीपासून बदलापूरच्या उल्हासनदीवरील चौपाटीवर ‘बदलापूर महोत्सव’ सुरू आहे. वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून चार वर्षापासून हा महोत्सव भरविला जात आहे. नृत्याची जुगलबंदी पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व प्रांताचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले. या नृत्यासोबत परदेशातून आलेल्या तीन कलाकारांनी बदलापूरकरांना थिरकायला लावले.