शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

'एक शरद अन् सगळेच गारद, पवारसाहेबांवर प्रेयसीच्या पलिकडचं प्रेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 22:45 IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत

मुंबई - बाळासाहेब आणि शरद पवार हे महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आहे. शरद पवारांवर आव्हाड यांचं खूप प्रेम आहे. प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम पवार यांच्यावर आहे. आमचंही शरद पवारांवर खूप प्रेम आहे. कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त आहे, हे पवारसाहेबांना माहितीय, असे म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंब्रा-कळवा येथील कार्यक्रमात पवारांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच, महाविकास आघाडीची पहिली ठिणगी केव्हा पडली, हेही राऊत यांनी सांगितलं.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरील प्रेमाचा दाखला दिला. मी कार्यक्रमाला येताना होर्डिंग्ज पाहिले, त्यावर भीष्म पितामह असे लिहिले होते. मला वाटतं यात काहीच गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण, बाळासाहेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती, दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब हेच दोन विठ्ठल. 

महाविकास आघाडीची पहिली ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा शरद पवार यांना ईडीची नोटीस गेली. कारण, आज शरद पवार यांना नोटीस पाठवली, उद्या सामान्य कार्यकर्त्यांवर ही वेळ येईल. बाळासाहेबांच्या एका व्यंगचित्राची आठवण करुन देताना, एक शरद अन् दोन गारद असं ते व्यंगचित्र होतं. पण, सद्यपरिस्थितीत ते व्यंगचित्र म्हणजे एक शरद अन् सगळे गारद असंच होईल, असेही राऊत यांनी म्हटले. जितेंद्र आव्हाड हा कडवा शिवसैनिक आहे. पण, हा शिवसैनिक पवारांवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे, असे म्हणत बाळासाहेब आणि संजय राऊत यांचं जसं नातं होतं. तसंच, नातं शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं असल्याचं राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, आजचा कार्यक्रम हा गुरुकडून शिष्याच्या सत्काराचा कार्यक्रम असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतthaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड