शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दहा पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:21 IST

शासकीय नोकरी मिळाल्यावर आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही, असा गैरसमज बऱ्याच जणांना असतो.

ठाणे : शासकीय नोकरी मिळाल्यावर आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही, असा गैरसमज बऱ्याच जणांना असतो. मात्र, त्याला छेद देत ठाणे शहर पोलिसांनी तब्बल १० जणांना कायमचा घरचा रस्ता दाखवला आहे. त्यातच, वारंवार गैरहजर राहणे, ने-आण करताना आरोपीने पलायन करणे, गुन्ह्णाच्या तपासात हलगर्जी करणे, बंदोबस्ताला उपस्थित न राहणे यासारख्या विविध प्रकरणांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल ३५६ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची चौकशी करून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा केल्या आहेत. त्यातच, घरी बसवलेल्या कर्मचाºयांमुळे पोलीस आयुक्तालयात रिक्त झालेल्या १० जागा येत्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेत भरण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या विविध प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. त्यातून ठाणे शहर पोलिसांची बदनामी होऊ लागल्याने शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लक्ष देत तातडीने ही प्रकरणे मार्गी लावल्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस विभागामार्फत जानेवारी ते आॅगस्ट २०१९ दरम्यान ३५६ जणांची चौकशी करून ती प्रकरणे निकाली काढली. त्यामध्ये १० जणांवर बडतर्फीची कारवाई, तर काहींना सक्तीची ताकीद, दंड, मूळ वेतनावर ठेवणे अशा प्रकारे विविध शिक्षा केल्या आहेत.