शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळे!

By admin | Updated: February 14, 2016 03:05 IST

कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता. शिवसेना-भाजपाच्या भूलथापांना बळी पडायला नको होते. आता या दोन्ही शहरांतील नागरिकांना आपल्या कर्माची फळे भोगण्याशिवाय पर्याय नाही, अशी कडवट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.मनसेच्या शहरातील मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते येथे आले होते. फडके क्रॉस रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी त्यांनी केला. त्या वेळी त्यांना प्रसिद्धिमाध्यमांनी पाणीबाणीबाबत छेडले असता, त्यांनी ही तिखट आणि तिरकस प्रतिक्रिया दिली. त्या वेळच्या प्रचारादरम्यान आम्ही या दोन्ही पक्षांविषयी सांगत होतो. पण, मतदारांनी तेव्हा विचार केला नाही, त्यामुळे आता त्याचा त्रास होणारच, असे सांगत त्यांनी या प्रश्नांची जबाबदारी पालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपावर ढकलली. या वेळी शहराध्यक्ष मनोज घरत, उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, पक्षाचे सर्व नगरसेवक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. चाफेकर यांचाही गौरव सह्यांच्या संग्रहाचे रेकॉर्ड केल्यामुळे लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतीश चाफेकर यांचा समावेश झाला आहे. त्यांच्यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल, चाफेकर यांचाही सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.