शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या पिक कर्जास विलंब

By admin | Updated: May 11, 2015 01:30 IST

खर्डी व कसारा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सेवा संस्थेच्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी केली आहे.

मनीष दोंद, खर्डीखर्डी व कसारा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सेवा संस्थेच्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना या वर्षाकरिता जिल्हा बँकेने नवीन अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे वाटप सुरू न केल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बॅँकेच्या या असहकार धोरणामुळे या भागात खासगी सावकारांची मात्र चांगलीच चलती आहे.बँकेने या वर्षी नवीन सातबारा उतारे घेतल्याशिवाय कर्जवाटप करू नये, असे परिपत्रक आपल्या सर्व शाखांना दिल्याने अद्याप पीक कर्जाचे वाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. सातबारा आॅनलाइन झाल्यामुळे संपूर्ण दप्तर अपडेट झाले नसल्याने नवीन उतारा मिळण्यास विलंब होत आहे. तलाठी कार्यालयातून नवीन उतारे मिळविण्यास चकरा माराव्या लागत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. बँकेच्या या लालफितीविरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेवा सोसायट्यांनीसुद्धा बँकेला मागील उताऱ्यांच्या आधारावर शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे, अशी विनंती केली असून ती बँकेने फेटाळल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेत कर्ज उपलब्ध होत नसल्याने विभागातील बरेच शेतकरी खाजगी सावकारांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली असताना बँक अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विसर पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष न देता विभागातील २००-२५० शेतकरी रोज कर्जासाठी येरझाऱ्या घालत आहेत. तलाठी कार्यालयातून आॅनलाइन सातबारा उतारे शेतकऱ्यांना मिळालेच नसल्याने व जुन्या उताऱ्यांवर बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूने शेतकरी अडचणीत आले आहेत. - सुरेश सापळे, रा. चांदे, स्थानिक शेतकरी