शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:49 IST

ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही ठाण्यासारख्या सुशिक्षित मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत १.६४ टक्के घट झाली. तर कल्याण आणि भिवंडीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाण्यात ४९.२३ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत १.६४ टक्के कमी मतदान झाले तर कल्याणमध्ये ४५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ४२.८८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत २.३९ टक्के मतदान वाढले आहे. तर भिवंडीत ५३.०७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीत ५१.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात १.४५ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता ठाण्यात १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. भिवंडीत १ लाख २७ हजार ७४ मतांची वाढ झाली आहे. तर कल्याणमध्ये ६४ हजार ३९५ एवढ्या मतांची वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ठाण्यातील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी (५०.८७ टक्के) मतदान केले होेते. यावेळी २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी (४९.२३ टक्के ) हक्क बजावला. यावरून १.६४ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता १ लाख १२ हजार ६९७ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. ठाण्यात मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आले. कल्याण आणि भिवंडीमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. अनेकांची नावेच गहाळ होती. त्यामुळे अनेक मतदारांची ईच्छा असूनही, त्यांना मतदान करता आले नाही.

मतदारयाद्यांमध्ये यावेळीही ठिकठिकाणी त्रुटी आढळल्या. एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. शिवाय वाढत्या उन्हामुळे आणि सलग आलेल्या पाच दिवसांच्या सुट्यांचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदानthane-pcठाणे