शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशा पथक आणि आयोजकांतच वादाचे ढोल

By admin | Updated: March 22, 2017 01:31 IST

आवाजाच्या मर्यादेचे निर्बंध लागू झाल्याने गुढीपाडव्याच्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी करुन न घेण्याचा निर्णय

प्रज्ञा म्हात्रे / ठाणेआवाजाच्या मर्यादेचे निर्बंध लागू झाल्याने गुढीपाडव्याच्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल-ताशा पथक सहभागी करुन न घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतल्याने स्वागतयात्रेच्या मुख्य आकर्षणावरच गदा येणार आहे. या निर्णयावर पथकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आमचीच जाण्याची इच्छा नसल्याची टीका केली आहे. ही पथकेचनसतील, तर यात्रेला शोभा राहणार नाही. त्यामुळे स्वागतयात्रेत ढोल-ताशा असलाच पाहिजे, असा हट्ट ठाण्यातील तरुणांनी धरल्याने वादाचे ढोल आतापासूनच वाजू लागले आहेत.त्यातच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी यात्रेच्या आयोजकांची नसेल तर आमची असेल अशी हमी सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघटनेने द्यावी, असेही आयोजकांचे म्हणणे असल्याने तोही वादाचा मुद्दा ठरणार असून त्याचा परिणाम संस्थांच्या सहभागावर होण्याची भीती वर्तवली जात आहे. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गेल्या १५ वर्षांपासून ठाण्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वागतयात्रा आयोजित केली जाते. अलिकडच्या काही वर्षांत आयोजकांनी ढोल-ताशा पथकांनाही स्वागतयात्रेत सहभागी करुन घेण्यास सुरूवात केली. ढोल-ताशांचे वादन तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने हे वादन गर्दीचे केंद्र ठरू लागले. पारंपरिक वेशभूषेत होणारे हे वादन हा स्वागतयात्रांचा ‘यूएसपी’ बनला. यंदा मात्र आवाजाच्या मर्यादेच्या बंधनांमुळे पथकांना सहभागी करुन घेतले जाणार नसल्याचा निर्णय आयोजकांनी सध्या तरी घेतला आहे. याबाबत आम्ही बैठका घेऊ, अशी सारवासारवही लगेचच त्यांनी केली. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून हा निर्णय घेताना आयोजकांनी नीट विचार केलेला नाही. चित्ररथ पाहायला जितकी गर्दी होत नाही, तितके ठाणेकर ढोल-ताशा पथकांचे वादन पाहण्यासाठी जमतात. पण आयोजकांचेच नियोजनच ढिसाळ असल्याने आम्हाला सहभागी होण्याची इच्छा उरली नसल्याचा संताप काही ढोल-ताशा पथकांनी व्यक्त केला. स्वागतयात्रेत पथक असायलाच हवे. ध्वनीप्रदुषण तर दोन माणसांमधल्या संभाषणाने देखील होत असते. त्याचा किती बाऊ करायचा? त्यामुळे आयोजकांवर आम्ही खरोखर नाराज आहोत. ही तर ‘गरज सरो, वैद्य मरो,’ अशी अवस्था झाल्याचे काही पथकांनी लक्षात आणून दिले. स्वागतयात्रेतील ढोल- ताशा पथकांचे वादन पाहण्यासाठी आम्ही येत असतो. चार तासांच्या वादनाने असे किती ध्वनीप्रदूषण होणार आहे? इतर वेळी होणाऱ्या आवाजांचा, वाहनांच्या कर्कश हॉर्नचा त्रास होत नाही का? असा खडा सवाल करून मराठमोळ््या सणानिमित्त काढल्या जाणाऱ्या या स्वागतयात्रेत पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा पथक नक्कीच असले पाहिजे. ते असेल तरच या स्वागतयात्रेला काही अर्थ आहे, अशी भावना ठाण्यातील तरुणांनी व्यक्त केल्याने आयोजकांची पुरती कोंडी झाली आहे.