शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

गटारातील पाइपगळतीवर भागते तहान

By admin | Updated: February 4, 2016 01:56 IST

पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत

वसई : पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. गटारात उतरून मिळेत तेवढे पाणी भरण्यासाठी याठिकाणी चोवीस तास लोक रांगा लावून उभे असलेले पहावयास मिळते. नालासोपारा आणि वसईच्या पूर्वेकडे बेकायदा चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या पाण्यासाठी आजही वणवण भटकावे लागत आहे. महापालिकेकडून नळ कनेक्शन मिळत नसल्याने मिळेत तिथून पाणी आणण्यासाठी लोक रस्त्यावरून फिरताना पहावयास मिळतात. गोखीवरे रेंज नाका परिसरात तर गटारातून पाणी भरले जात आहे. याठिकाणाहून नवघर-माणिकपूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जाते. रस्ता रुंदीकरण झाल्याने गटारे नव्याने बांधली गेली आहेत. त्या गटारांमधून ही मुख्य पाईपलाईन जाते. त्यावर आता फुटपाथ बांधण्यात आले आहेत. फुटपाथवरील मेन होलची झाकणे गायब झाली आहेत. त्या होलमधून लोक गटारात शिरतात. गटारातून जाणारी पाईपलाईन लिकेज असल्याने काही ठिकाणी पाणी गळती असते. ते पाणी घेण्यासाठी लोकांची चोवीस तास रांग लागलेली दिसते. पुरुष, महिला आणि लहान मुले प्लॅस्टिकचे ड्रम आणि हंडे घेऊन पाण्यासाठी रांग लावून उभे असतात. जसा नंबर येईल त्यानुसार घरातील एक व्यक्ती गटारात उतरून आतून पाणी भरुन वर असलेल्या आपल्या माणसाकडे देताना दिसते. ही पाईपलाईन गटारातून जात असून गेल्या काही महिन्यांपासून तिला गळती लागली आहे. पण, पालिकेकडून तिची दुरुस्ती केली जात नसल्याने लोक येथील पाणी नेत आहे. दुसरीकडे, गटारातच लिकेज असल्याने पाण्यामध्ये गटाराचे दूषित पाणी शिरत असण्याचाही धोका आहे. त्यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्याण झाला आहे. (प्रतिनिधी)