शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या आरक्षित जागांवर ‘अवजड’ पार्किंग

By admin | Updated: November 17, 2016 06:55 IST

ठाण्यातील आपले आरक्षित असलेले भूखंड एसटी महामंडळाने ताब्यात न घेतल्याने पालिकेने आता या भूखंडांवर अवजड वाहनांसाठीचे

ठाणे : ठाण्यातील आपले आरक्षित असलेले भूखंड एसटी महामंडळाने ताब्यात न घेतल्याने पालिकेने आता या भूखंडांवर अवजड वाहनांसाठीचे पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु, पालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याने वाहनचालक शहरात कुठेही आणि कशीही आपले वाहने उभी करताना दिसत आहेत. यामुळे यावर उपाय म्हणून शहरातील आरक्षित आणि मोकळे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर पार्किंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, एसटीच्या आरक्षित भूखंडांकडे पालिकेने आपली वक्रदृष्टी वळवून ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे खोपट, कळवा येथे वर्कशॉप असून खोपट येथील वर्कशॉपच्या जागेचे बीओटी तत्त्वावर पुनर्निर्माण केले आहे. हे पुनर्निर्माण करताना एकूण भूखंडांच्या क्षेत्रफळापैकी काही भागांवर वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊन वर्कशॉपची जागा कमी केली आहे. याचाच अर्थ एसटी महामंडळाकडे ठाण्यात पुरेशी जागा आहे, असा कयास पालिकेने बांधला आहे. त्यामुळेच महामंडळाने बाळकुम येथील २.२५ हेक्टरचा आरक्षित भूखंड अद्यापही ताब्यात घेतलेला नाही. शिवाय, नौपाडा येथील भूखंडदेखील याच पद्धतीने अद्यापही एसटीने ताब्यात घेतलेला नाही. याचाच अर्थ एसटी महामंडळाला आता शहरात जागेची आवश्यकता नसल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, दुसरीकडे शहरात दरदिवशी ट्रक, टेम्पो, बस आदी अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून त्यांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी राहताना दिसत आहेत. त्यामुळे काही भागांत वाहतूककोंडीदेखील होत आहे. त्यामुळे या वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ही नामी शक्कल लढवली आहे. त्यानुसार, बाळकुम आणि नौपाडा भागातील एसटीच्या आरक्षित भूखंडावर अवजड वाहनांचे पार्किंग असा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फेरबदलाचा प्रस्ताव पुढे आणताना पालिकेने यासंदर्भात सूचना व हरकतीदेखील मागवल्या आहेत. पालिकेने घेतलेल्या सुनावणीमध्ये १८ हरकतदार उपस्थित होते. त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, १५ दिवसांत कोणीही लेखी निवेदनाव्यतिरिक्त कोणतीही लेखी हरकत दिलेली नाही. तसेच या सुनावणीत भूखंडधारकास आरक्षणामधील २० टक्के पार्किंगचे आरक्षण द्यावे, अशी मागणी सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. परंतु, २० टक्के आरक्षण देणे शक्य नसल्याने या हरकती फेटाळल्या. यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता मु.भ. मेराजी हे सुनावणीदरम्यान उपस्थित होते. त्यांनीदेखील लेखी अथवा तोंडी म्हणणे न मांडता एक महिन्याची मुदत मागितली होती. त्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु, या कालावधीत त्यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. एकूणच महामंडळाने १९९९ पासून या आरक्षित भूखंडांचा विकास केला नाहीच, शिवाय ते ताब्यातही घेतले नाहीत. त्यामुळेच आता हा फेरबदलाचा प्रस्ताव पुढे आणल्याचा पालिकेचा दावा आहे. त्यानुसार, या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)