शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 17:48 IST

लॉकडाऊनच्या काळात खासदारांनी केली मदत

कल्याण-कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने कोरोनाची लागण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण आणि वैद्यकीय स्टाफ यांचे प्रमाण व्यस्त आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंबिवलीतील तरुण प्रतिक तिरोडकर याने कोविड रोबोट तयार केला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत रोबोट तयार करण्यासाठी लागणारी तांत्रिक साधनसामग्री कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिंदे यांनी उपलब्ध करुन दिली. हा रोबोट कल्याण डोंबिवली महापालिकेस सूपूर्द करण्यात आला. तो महापालिकेच्या कोविड रुग्णालयात कार्यान्वित केला जाणार आहे.तिरोडकर हे डोंबिवली पूर्वेतील सुनिल नगरात राहतात. त्यांनी नवी मुंबईतील भारती विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. रोबोट तयार करण्यात त्यांचे खास प्राविण्य आहे. यापूर्वी त्यांनी अनेक रोबोट तयार केले आहेत. मात्र कोरोनाच्या काळात रुग्णाचा संपर्क टाळण्यासाठी खास करुन कोविड रोबोट तयार करण्याचे काम सुरु केले. ही बाब खासदार शिंदे यांना कळताच त्यांनी त्यांना मदत केली. भारतात जपान व चीनवरुन रोबोट आयात केले जातात. तिरोडकर यांनी भारतीय बनावटीचा कोविड रोबोट तयार केला आहे. चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या रोबोटची किंमत चार ते पाच लाख रुपये असते. भारतीय बनावटीचा रोबोट दीड ते दोन लाख रुपये किंमतीत तयार करता येऊ शकतो. कोविड रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या सेवेत हा रोबोट काम करु शकतो. एकाच वेळी या रोबोटच्या माध्यमातून 10 ते 15 रुग्णांना गरम पाणी देता येऊ शकते. सॅनिटाईज करण्याचे, जेवण देण्याचे कामदेखील हा बहुआयामी रोबोट करतो. त्यामुळे पॅरामेडीकल स्टाफला रुग्णांच्या संपर्कात न जाता रोबोटच्या माध्यमातून सेवा देणे शक्य होईल असा दावा तिरोडकर यांनी केला आहे. या रोबोटचे प्रात्याक्षिक खासदार शिंदे यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा रोबोट महापालिकेच्या रुग्णालयास डोनेट करण्यात आला आहे.याप्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यावर मात करण्यासाठी हा कोविड रोबोट चांगला उपाय ठरणार आहे. मनुष्यबळाची बचत या रोबोटमुळे होऊ शकते. तसेच कोरोनाची लागणही टाळता येऊ शकते. आज रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आहे. हा विळखा सोडविण्यास या रोबोटची मदत होऊ शकते. त्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य होऊ शकते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या