Coronavirus : डाळींसह भाजीपाल्याचा भाव वाढल्याने ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:54 AM2020-04-18T10:54:32+5:302020-04-18T10:58:24+5:30

Coronavirus : संचारबंदी आणि त्यात मालाचा होणार्‍या कमी पुरवठ्याचे कारण पुढे करुन दुकानदार डाळीं सारख्या अत्यावश्यक मालावर 50 टक्के वाढीव किंमत ग्राहकाकडून घेत असल्याचे वास्तव उघडकीस आले.

Coronavirus Vegetables price rise as ‘essential supply’ hit in thane SSS | Coronavirus : डाळींसह भाजीपाल्याचा भाव वाढल्याने ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप!

Coronavirus : डाळींसह भाजीपाल्याचा भाव वाढल्याने ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप!

googlenewsNext

सुरेश लोखंडे 

ठाणे - संचारबंदीचा वाढीव काळ लक्षात घेऊन जिल्ह्यातील किराणा दुकानांवर मिळणारे कडधान्य, डाळी, अत्यावश्यक भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. कोथिंबीर ची जुडी 50 ते 100 रुपयांस मिळत आहे. डाळी 100 ऐवजी 140 ते 150 रुपये किलोने देऊन दुकानदारांकडून ग्राहकांची मनमांनी लूट किली जात असल्याचे निदर्शनात आले. 

दुकानदारांनी मूळ किंमती पेक्षा जास्त किंमत आकारु नये, मालाचा साठा करुन कृत्रिम तुटवडा करू नये,असे करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने या आधीच दिला आहे. मात्र त्याचे पालन सुरू असल्याचे भासवल्या जात आहे.  संचारबंदी आणि त्यात मालाचा होणार्‍या कमी पुरवठ्याचे कारण पुढे करुन दुकानदार डाळीं सारख्या अत्यावश्यक मालावर 50 टक्के वाढीव किंमत ग्राहकाकडून घेत असल्याचे वास्तव उघडकीस आले. कोरोनाच्या भीती दाखल नागरीक शुद्ध शाकाहारी भोजन करीत आहेत. यातील पालेभाज्या आणि कडधान्य खरेदीवर भर देत आहेत. 40 रुपये मिळणारी भेंडी कमीतकमी 60 ते 80 रुपये  किलो मिळत आहे. कांदा 25 ते 30 , मिरची आधी 60 रुपये मिळणारी आता 130 ते 160 रुपये मिळत आहे. 

कडधान्याला या काळात आधी महत्व आले आहे. ग्राहकांकडून तूर, मूग, उडीद, मठ, चवळी, मसूर आदींच्या डाळी आधी केवळ सरासरी 25 रुपये पाव होत्या. आता कमीतकमी 35 रुपये पाव मिळत आहे. या वाढीव भावचा भडका ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या मध्यमवर्गीय ग्राहकांच्या तुलनेत उल्हासनगरच्या कामगार, कष्ठकरी, मजुरांमध्ये अधिक तीव्रतेने जाणवत आहे.मध्यमवर्गीय, गरीबांची होणारी ही लूट वेळीच थांबवण्यासाठी रेशनिंग दुकानांवर डाळींचा पुरवठ्या चे वृत्त लोकमतने 'स्वस्त धान्य दुकानात डाळींसह तेल - साखरेचा अभाव'  या मथळ्याखाली 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत आमदारांनी देखील हा विषय मुख्यमंत्यांच्या निदर्शनात आणून दिला आहे. मात्र त्यावरील निर्णया आधीच दुकानदारांनी डाळी, तेल, साखरेचे भाव वाढवून सामान्य ग्राहकांची कोंडी केली आहे.डाळींच्या या चढ्या भावामुळे या कडक उन्हात उडदाचे पापड, करोडे, मूंगवडे आदी वाळवन करण्यासाठी गृहिणींना सध्याची भाववाढ डोकेदुखी ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

 

Web Title: Coronavirus Vegetables price rise as ‘essential supply’ hit in thane SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.