कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:43 AM2020-04-18T05:43:10+5:302020-04-18T05:43:23+5:30

डॉ. रमण गंगाखेडकर : अभ्यास सुरू, घाईने निष्कर्ष काढणे चूक ठरेल; जीबीआरसीने निर्माण केली होती आशा

Corona's Secret: ICMR Denies 'That' Claim | कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

Next

नवी दिल्ली : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने (जीबीआरसी) कोरोना विषाणूचे (कोविड-१९) अस्तित्व नऊ स्वरुपात असल्याचे गुरुवारी सांगून त्यामुळे या महामारीचे रहस्य उलगडण्याबाबत आशा निर्माण झाल्याचा दावा केला होता. हा दावा इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) फेटाळून लावला आहे. जीबीआरसी ही सरकारची संस्था आहे. जीबीआरसीच्या दाव्यांमुळे कोविड-१९ वर लवकरच लस (व्हॅक्सीन) विकसित होईल अशी आशा निर्माण झाली होती.

काही शास्त्रज्ञांना तर असेही वाटले की, सार्स इत्यादीसारखा विषाणू जसा स्वत:च मरण पावतो तसा मृत्यू कोविड-१९ चाही होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव हरीत शुक्ला म्हणाले की, डीएनए निश्चित करण्याच्या प्रक्रियेचे निष्कर्ष हे व्हायरल इन्फेक्शन आणि लस विकसित करण्यासाठी जी औषधाची व्यूहरचना करावी लागते त्यासाठी महत्वाचे ठरतात. तथापि, आयसीएमआरचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रवक्ते डॉ. रमण आर.गंगाखेडकर म्हणाले, इतक्या तातडीने काही निष्कर्ष काढणे घाईचे होईल. कोरोना विषाणूच्या वेगवेगळ््या जाती भारतात चीन, इटली, इराणमधून आल्या आहेत. आम्ही केलेल्या अभ्यासाने हे दाखवले की चीनमधून जे लोक आले त्यांचा विषाणू हा इटलीतून आलेल्यांच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. इराणमधून आलेला विषाणू हा चीनमधील विषाणूशी काही सारखेपणा दाखवणारा आहे.विषाणूच्या अशा बदलांतून काहीही निष्कर्ष काढता येणार नाही. डॉ. गंगाखेडकर यांनी तीन  प्रकारचे विषाणू असतात, असे म्हटल्यामुळे गुजरातच्या प्रतिष्ठित अशा प्रयोगशाळेने काढलेल्या निष्कर्षाला धक्का बसला आहे. परंतु, विषाणूतील परिवर्तन वा बदल हे फारच कमी असून त्यांचा संपूर्ण डीएनए निश्चित करण्याचा अभ्यास सुरू आहे.

सिक्वेंन्सिंगवर संशोधन सुरू आहे
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने समाजमाध्यमांवर पहिल्यांदा बुधवारी उशिरा ‘यशाचा मार्ग सापडल्याचे’ जाहीर केले होते. नंतर गांधीनगर येथील इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सी. जी. जोशी म्हणाले की, ‘‘कोविड-१९ च्या नमुन्याचा जिनोम सिक्वेंन्सिंग हा गुजरातमधील रुग्णाचा घेण्यात आला होता व त्यातून नऊ परिवर्तन उघड झाले होते.

च्त्यापैकी सहा हे वेगवेगळ््या देशांत पसरलेल्या महामारीतही होते; परंतु तीन बदल/परिवर्तन हे आमच्या सिक्वेंन्सिंगसाठी महत्त्वाचे आहेत. यातून हे दिसते की, विषाणू हा खूप वेगाने बदलत असतो.
च्परिवर्तन वा बदल हे अनेक घटकांवर अवलंबून असतात व पुढील अभ्यास सुरू आहे. डॉ. गंगाखेडकर हे या प्रकरणाशी सहमत दिसत नाहीत ते म्हणाले, सिक्वेंन्सिंगवर संशोधन सुरू आहे.

Web Title: Corona's Secret: ICMR Denies 'That' Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.