coronavirus : त्यांची गाडी दिसली की उपाशीपोटी असलेल्यांच्या चेहऱ्यावर फुलतो आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:37 PM2020-03-25T16:37:58+5:302020-03-25T16:38:59+5:30

राज्यात आणि आत्ता देशाभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे निराधार 

coronavirus: The joy of blossoming on the faces of those who starve when this car is seen | coronavirus : त्यांची गाडी दिसली की उपाशीपोटी असलेल्यांच्या चेहऱ्यावर फुलतो आनंद

coronavirus : त्यांची गाडी दिसली की उपाशीपोटी असलेल्यांच्या चेहऱ्यावर फुलतो आनंद

googlenewsNext

कल्याण-कोरोनाशी दोन हात करुन त्याला पिटाळून लावण्यासाठी आधी राज्यात आणि आत्ता देशाभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र जे लोक निराधार  आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून कल्याणमध्ये फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे. त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नसून भुकेल्यांसाठी त्यांची गाडी फिरतेय. त्यांची गाडी दिसली की निराधारांच्या चेह:यावर आनंद फुलतो. 

शहरात अत्यावश्यक सेवा वगळता काही एक सुरु नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेच्या वतीने फूड पॅकेटची गाडी गेल्या तीन दिवसापासून शहरात फिरते आहे. सोमवारी या गाडीतून 1 हजार जणांना फूड पॅकेट वाटप करण्यात आले आहे. काल मंगळवारी व आज बुधवारी ही फूड पॅकेट वाटप केले गेले. बेघर, हातावर पोट असलेले नाका कामगार यांना अन्नाचे वाटप केले जात आहे. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेले सरकारी कर्मचारी यांनाही जेवण दिले जात आहे. 

कल्याणच्या रेतीबंदर, बस स्टँड, स्टेशन परिसर, पोलिस, आरपीएफचे जवान, रुक्मीणीबाई रुग्णालय याठिकाणी फूट पॅकेटचे वाटप केले गेले. हे काम शिवसेना नगरसेवक सचिन बासरे व शिवसैनिक वंडार कारभारी, सशांक भोईर, जयेश लोखंडे, योगेश पष्टे, बाळा भोईर ही मंडळी करीत आहेत. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनानुसार सगळे लाेक घरात बसलेले असताना ही मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता भुकेल्यांना अन्न वाटप करीत फिरत आहेत. त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतूक होत आहेत.
 

Web Title: coronavirus: The joy of blossoming on the faces of those who starve when this car is seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.