शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 15:01 IST

कोरोनामुळे सर्व बच्चेकंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे.

कल्याण  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमूळे सध्या लहान काय आणि मोठे काय सर्वांचेच आयुष्य बदलून गेलं आहे. मोठी माणसं घरातील काही सामान आणण्यासाठी तरी बाहेर पडू शकतात पण लहानग्यांचे तर ते पण नाही. गेल्या आठवड्याभरापासून फक्त घर एके घर. ना खेळणं, ना बागडणे, ना शाळा आणि ना मित्र-मैत्रिणी. त्यामूळे लहान मुलांच्या मानसिक स्थितीवरही निश्चितच परिणाम होत असेल. हा विचार डोळ्यासमोर ठेऊन कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने राबवलेला ऑनलाइन शाळेचा उपक्रम मुलांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.कोरोनामुळे सर्व बच्चेकंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे. मात्र मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सुट्टी आवश्यक असली तरी घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी बालक मंदिरच्या विलास लिखार यांनी सुरू केलेली ऑनलाईन शाळा मुलांचा हा कंटाळा दूर करताना दिसतेय.विलास लिखार यांनी झूम ऍपच्या माध्यमातून 'ऑनलाईन' शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील मुलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. छानपैकी धम्माल-मस्ती आणि गप्पा गोष्टींच्या माध्यमातून मुलांचा ऑनलाईन अभ्यासही सुरू आहे. या उपक्रमाला मुलांबरोबरच त्यांचे पालकही उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे लिखार यांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे घरात बसून कंटाळलेली मुले आणि त्यांचा कंटाळा काढून काढून थकलेले पालक हे दोघेही या ऑनलाईन शाळेवर बेहद खुश आहेत.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस