शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलण्याचा ठेका बहुमताने मंजूर

By admin | Updated: January 21, 2016 02:34 IST

अंबरनाथ नगरपरिषदेच्या बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापनेचा ठेका पालिका सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापनेचा ठेका पालिका सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. एकूण १७ कोटींची ही निविदा असून त्यात कचरा उचलण्याकरिता ६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही निविदा मंजूर झाल्याने शहरातील प्रत्येक प्रभागातील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी मिळणार आहे. सोबत अतिरिक्त कामगारही मिळणार आहेत.अंबरनाथ पालिकेचा कचरा उचलण्याचा ठेका २००९-१०मध्ये अंबरनाथच्या मे.पनवेलकर यांना देण्यात आला होता. या कामासाठी ५ वर्षांची मुदत होती. ही मुदत मार्च २०१५ मध्ये संपली असून या कामासाठी नवीन निविदा मागविण्यात येणार होती. मात्र निविदा काढण्याबाबत एकवाक्यता नसल्याने निविदा प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे पनवेलकर यांनाच मुदतवाढ देत हे काम करण्यात येत आहे. अखेर मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी निविदेचा आराखडा तयार करुन त्याची मंजुरी सभागृहात घेतली.निविदा प्रक्रियेमध्ये चार ठेकेदारांनी आपल्या निविदा भरल्या होत्या. मात्र त्यातील विद्यमान ठेकेदार पनवेलकर यांची निविदा कागदपत्रांची पूर्तता नसल्याने रद्द करण्यात आली. उर्वरीत तीन ठेकेदारांच्या निविदा उघडण्यात आल्या. या निविदेसाठी समिक्षा कंस्ट्रक्शन कंपनी यांनी १७ कोटी ४७ लाख रुपये किमतीची निविदा भरली होती. तर प्रतिस्पर्धी आर अँड बी इन्फ्रा यांनी १७ कोटी ९१ लाखांची तर बी.व्ही.जी. इंडिया या कंपनीने २० कोटी ८० लाख रुपये किमतीची निविदा होती. सर्वात कमी दराची निविदा समिक्षा कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याने ही निविदा पालिका सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. या निविदेवर चर्चा करतांना शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी निविदेमधील त्रुटी सभागृहासमोर आणून निविदा परत मागविण्याची मागणी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र शिवसेनेच्याच नगरसेवकांनी ठरावाला विरोध असल्याचे सांगन हा विषय मताला टाकण्याची मागणी केली. नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी हा विषय मताला टाकल्यावर ठरावाच्या विरोधात सेनेचे अब्दुल शेख, छाया दिवेकर, शरिफा शेख, यांच्यासह भाजपाचे सुनील सोनी आणि राष्ट्रवादीचे उमर इंजिनीअर यांनी मतदान केले. तर भाजपाच्या इतर नगरसेवकांनी आणि मनसेच्या दोन नगरसेविकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. उर्वरीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पडली आहे. निविदेत ठेकेदाराने दिलेले दर हे शासकीय दरापेक्षा कमी आहेत. तसेच कचरा उचलण्याचे काम आणि कामगार पुरविण्याचे काम हे दोन्ही विषय वेगळे आहेत. शहरात स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रशासनाने हा प्रयत्न केलेला आहे.- गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ