भिवंडीत फुटीमुळे काँग्रेसचे पारडे जड; आज महापौर, उपमहापौर निवडणूक; ‘सेक्युलर फ्रंट’ने जारी केला व्हीप चाैधरींचा गट ‘फ्रंट’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 05:55 IST2026-02-20T05:52:26+5:302026-02-20T05:55:13+5:30

भिवंडी महापालिकेत भाजपचे २२ सदस्य आहेत. त्यापैकी नारायण चौधरी १४ नगरसेवकांसह ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सहभागी झाल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. नारायण चौधरी आता काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’चे महापौरपदाचे उमेदवार आहेत. तसा व्हीप पक्षाने काढला आहे.

Congress's party is facing a tough time due to the split in Bhiwandi; Mayor and Deputy Mayor elections today; 'Secular Front' issues whip to include Chaudhary's group in 'Front' | भिवंडीत फुटीमुळे काँग्रेसचे पारडे जड; आज महापौर, उपमहापौर निवडणूक; ‘सेक्युलर फ्रंट’ने जारी केला व्हीप चाैधरींचा गट ‘फ्रंट’मध्ये

भिवंडीत फुटीमुळे काँग्रेसचे पारडे जड; आज महापौर, उपमहापौर निवडणूक; ‘सेक्युलर फ्रंट’ने जारी केला व्हीप चाैधरींचा गट ‘फ्रंट’मध्ये

भिवंडी : भाजपच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याने महापौर व उपमहापौरपदाच्या शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड झाले आहे. भाजपने बुधवारी नारायण चौधरी यांना डावलून स्नेहा पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज चौधरी सहकाऱ्यांसह काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सहभागी झाले आहेत.

भिवंडी महापालिकेत भाजपचे २२ सदस्य आहेत. त्यापैकी नारायण चौधरी १४ नगरसेवकांसह ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सहभागी झाल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. नारायण चौधरी आता काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’चे महापौरपदाचे उमेदवार आहेत. तसा व्हीप पक्षाने काढला आहे.

मागील तीन वर्षांपासून बंद असलेले महापौर दालन पुन्हा उघडण्यात आले आहे. त्याची स्वच्छता करण्यात आली आहे. नव्या महापौरांच्या स्वागतासाठी दालन पूर्णतः तयार करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

प्रदेश काँग्रेसने भाजपला पक्ष विकला; शहराध्यक्षांची राहुल गांधींकडे तक्रार

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये दोन गट पडल्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने समाजवादी पक्षाशी संगनमत करून आपला पक्ष भाजपला विकला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार त्यांनी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

९० नगरसेवकांच्या भिवंडीत काँग्रेसचे ३० व राष्ट्रवादी (शरद पवार)चे १२ असे ४२ चे संख्याबळ आहे. महापौरपदासाठी केवळ चार सदस्यांची आवश्यकता आहे. मात्र, याबाबतच्या कोणत्याही वाटाघाटी करण्याच्या सूचना मला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिल्या नाहीत. उलट त्यांनी समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख

यांच्या सोबतीने काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता प्रदेश काँग्रेसने शेख यांच्याशी संगनमत करून भिवंडीत काँग्रेस पक्ष भाजपला विकला आहे, असा आरोप ताहीर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

पालिकेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसचा व्हीप

काँग्रेसने महापौरपदासाठी नारायण चौधरी व उपमहापौरपदाचे उमेदवार  तारिक मोमीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसा व्हीप पक्षाने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिटकविला आहे.

शिंदेसेनेला दोष देऊ नका : काटेकर

भाजपचा महापौरपदाचा उमेदवारच काँग्रेससोबत पळून गेला आहे. त्यांनी शिंदेसेनेला दोष देऊ नये. शिंदेसेनेने नेहमीच महायुतीचा धर्म पाळला आहे. भाजपचा गटनेता व महापौरपदाचा दावेदार पळून जाणे, दुर्दैवी आहे; अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे गटनेते मनोज काटेकर यांनी दिली.

भिवंडीचा महापौर सेक्युलर फ्रंटचा होईल : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भिवंडी महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवली आणि पक्षाचे सर्वात जास्त ३० नगरसेवक निवडून झाले. काँग्रेसला राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आहे. परंतु,  बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप आणि शिंदेसेनेसोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे.

आता भाजपचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाल्याने भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी (शरद पवार)चे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी गुरुवारी टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर सपकाळ यांनी भिवंडी महापालिकेत सेक्युलर फ्रंटची सत्ता येईल, असा दावा केला.

Web Title : भिवंडी में भाजपा विभाजन से कांग्रेस मजबूत; आज महापौर चुनाव।

Web Summary : भिवंडी में भाजपा की कलह से महापौर चुनाव में कांग्रेस को फायदा। नारायण चौधरी उम्मीदवारी से वंचित रहने पर सेक्युलर फ्रंट में शामिल हुए। कांग्रेस को जीत का भरोसा। आंतरिक पार्टी संघर्ष उजागर।

Web Title : Bhiwandi Congress strengthened by BJP split; Mayor election today.

Web Summary : BJP infighting in Bhiwandi favors Congress in mayoral election. Narayan Chaudhari joined Secular Front after being denied candidacy. Congress confident of victory. Internal party conflict exposed.