शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्यांमध्ये बालमनाचा विचार गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:26 IST

आशीष शेलार यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘बालनाट्ये फक्त बालकलाकारांनीच सादर केली पाहिजेत असे नसून, बालप्रेक्षकांच्या मनाचा, वयाचा विचार करून सादर केलेले बालप्रेक्षकांसाठीचे नाटक म्हणजे बालनाट्य होय. असे सोहळे बालरंगभूमी सक्षम करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. ही चळवळ फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता ती राज्यव्यापी कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत माजी शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यावेळी व्यक्त केले.

मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत केबीपी महाविद्यालयात हा सोहळा नुकताच झाला. शेलार यांच्या हस्ते ज्येष्ठ बालनाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांना ‘गंधार गौरव पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रा. प्रदीप ढवळ, सचिन मोरे आदी मान्यवर तसेच सिनेनाट्य क्षेत्रातील नामवंत कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

बालरंगभूमीला मुख्य प्रवाहात आणण्याची आज आवश्यकता आहे. कारण आजची बालरंगभूमीच उद्याची व्यावसायिक रंगभूमी आहे, असे प्रतिपादन म्हस्के यांनी केले. 

बालप्रेक्षक निरागस आणि खरे असतात. त्यांना आवडले तरच ते दाद देतात अन्यथा गप्प बसतात. त्यामुळे बालनाट्य करणे ही सगळ्यात कठीण गोष्ट असल्याचे मत प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केले. व्यावसायिक नाटकाचा जेवढा खर्च असतो तेवढाच खर्च बालनाट्यालासुद्धा होतो. त्यामुळे बालनाट्यालासुद्धा शासनाने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. केळकर यांनी केली. 

कोरोना योद्धांचा गौरवया सोहळ्यामध्ये डाॅ. रूपाली काकुळते, डाॅ. रमेश अय्यर, डाॅ. पराग देशपांडे, डाॅ. मयूर महाजन, डाॅ. प्राची नारखेडे या डाॅक्टरांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, जयवंत वाडकर, समीर चौगुले, विजय गोखले, अशोक समेळ आणि काही बालकलाकारांनी या सोहळ्यास ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. मृगा पटवर्धन हिने ईशस्तवन तर निवेदन ‘गंधार’चे प्रमुख प्रा. मंदार टिल्लू यांनी केले.