मुख्यमंत्री सडकही उखडली

By Admin | Updated: June 21, 2017 04:23 IST2017-06-21T04:23:16+5:302017-06-21T04:23:16+5:30

पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून बनविण्यात आलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला

Chief Minister hoisted the road | मुख्यमंत्री सडकही उखडली

मुख्यमंत्री सडकही उखडली

सुरेश काटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून बनविण्यात आलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला, त्यावरून घसरून मोटरसायकलस्वार रोज जखमी होत आहेत, या नवीन रस्त्याच्या दुर्दशेबाबत वडवली सवणे ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्र ार केली आहे
तलासरी तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविलेले रस्ते अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व राजकारण्यांची उदासीनता या मुळे निकृष्ट दर्जाचे आहेत त्यातच आता मुख्यमंत्री सडक योजनेतून बनविलेले रस्ते ही निकृष्ट बनत आहेत, तालुक्यातील राज्य मार्ग ७३ वरील कवाडे ते सावरपाडा हा रस्ता व ह्या त्यावरील दोन मोऱ्या या निकृष्ट बनविल्याने तो दोन महिन्यातच उखडला. तसेच मोऱ्यांवरील भराव वाहून गेल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे
राज्य मार्ग ७३ वरील कवाडे ते सावरपाडा (वडवली सवणे कवाडा ) हा रस्ता ०० ते ८.२०० इतका असून त्याची अंदाजी किंमत १.९० लक्ष आहे रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले होते.

Web Title: Chief Minister hoisted the road