शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांमुळे गॉडफादर बदलले

By admin | Updated: May 12, 2017 01:34 IST

महापालिकेत एकाच विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त सुधाकर शिंदे

लोकमत न्युज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेत एकाच विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त सुधाकर शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे धाबे दणाणलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आता भाजपामधील ‘गॉडफादर’चे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेत सत्ताबदल झाल्यावर कारभार पारदर्शक होण्यासाठी प्रस्तापित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उचलबांगडीची करण्याची मागणी सत्ताधारी नगरसेवकांनीच उचलून धरली होती. आता आयुक्तांनी बदलीचा आसूड ओढताच भीतीपोटी ही मंडळी राजकारण्यांना शरण गेल्याने प्रशासनाच्या तळातील नोकरशाहीला आपल्या ताब्यात राखण्याची ही सत्ताधारी पक्षाची खेळी असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. उल्हासनगर महापालिकेत वरिष्ठ नेते व राजकीय नेत्यांच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे बदली होत नाही. आतापर्यंत शिवसेनेच्या ताब्यात सत्तेच्या नाड्या असल्याने अनेक अधिकाऱ्यांनी शिवसेनेतील गॉडफादर पकडले होते. आता सत्ताबदल होऊन भाजपाकडे सत्तेची सूत्रे आल्याने या अधिकाऱ्यांना सत्ताबदलाचा इंगा दाखवण्याकरिता भाजपाच्या नेत्यांनी बदल्यांकरिता आयुक्तांकडे आग्रह धरला. अधिकाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याच्या तक्रारी सत्ताधारी भाजपा नगरसेवकाकडे नागरिकांनी केल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवडयात शिक्षण मंडळातील शिक्षकांची सरसकट बदल्या आयुक्त शिंदे यांनी केल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक प्रदीप रामचंदानी, सभागृह नेता जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा आदींनी पालिका आयुक्ताकडे केली. आयुक्त शिंदे यांनी एकाच विभागात किमान ३ वर्षे राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे संकेत दिले आहेत. ज्यांनी एकाच विभागात संपूर्ण सेवाकाळ घालवला त्यांनी आता भाजपा नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे.