शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या दुरूस्तीसाठी वापरले फुटके पाइप; ग्रामस्थांनी पाडले काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:13 IST

लॉकडाउनच्या काळात कंत्राटदाराचं चांगभलं, २४ वर्षांनंतर कामाला मिळाली मंजुरी

- वसंत पानसरे किन्हवली : मुरबाड उपविभागांतर्गत असलेल्या अदिवली लघुपाटबंधारे धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. एक कोटीच्या आसपास निधी मंजूर असलेल्या या डाव्या कालव्याचे दोन किलोमीटर लांबीचे काम किन्हवली येथील कंत्राटदाराला मिळाले आहे. त्याने लॉकडाउनचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे काम करत असून जुन्याच फुटलेल्या पाइपचा वापर करून जोडण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.

अदिवली लघुपाटबंधारेअंतर्गत परिसरातील चरीव, अदिवली, आष्टे व मानेखिंड या गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळत असून सुमारे ७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. १९९५-९६ या वर्षी युरोपीय आर्थिक समुदाय यांच्या निधीतून दोन किलोमीटर डाव्या कालव्याचे भूअंतर्गत आरसीसी व पीयूसीचे काम झाले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी दुबार पीक घेत होते. परंतु, १५ वर्षे हा कालवा दुरुस्तीअभावी बंदच आहे.

तब्बल २४ वर्षांनंतर कालव्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाले असून तब्बल ९९ लाखांच्या खर्चाला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांना शेतीमध्ये दुबार पीक घेणे शक्य होणार होते. परंतु, कंत्राटदाराने या कामात नवीन पाइप, ६०० मिमी, ४५० मिमी व ३०० मिमी पाइप व पीयूसी दुरुस्ती, चेंबर बांधणे गरजेचे असताना लॉकडाउनचा फायदा घेत घाईघाईने काम पूर्ण करण्यासाठी फुटक्या प्लास्टिकच्या पाइपांचा वापर जोडण्यासाठी केला. ग्रामस्थांनी ही माहिती संबंधित अधिकाºयांना देताच दुरुस्तीचे काम बंद केले आहे. पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.

अदिवली लघुपाटबंधारे येथील डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असून कंत्राटदार जुनेच फुटलेले पाइप जोडत असल्याचे निदर्शनास आल्याने काम बंद करून नवीन पाइप बसविण्यास व अंदाजपत्रकानुसार काम करायला सांगितले आहे.- के.एस. भानुशाली, कनिष्ठ अभियंता

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे