खळबळजनक! बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला; गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:25 IST2020-12-28T17:23:07+5:302020-12-28T17:25:52+5:30
Ulhasnagar News : नातेवाईकसह नागरिकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली असून नालीचे चेंबर उघडे ठेवनाऱ्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी केली.

खळबळजनक! बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला; गुन्हा दाखल करण्याची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या यश भुजंग या मुलाचा मृतदेह परिसरातील बंद कंपनीच्या उघड्या नाल्याचे चेंबरमध्ये रविवारी मिळाला. नातेवाईकसह नागरिकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली असून नाल्याचे चेंबर उघडे ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-२ रमाबाई आंबेडकरनगर परिसरात ८ वर्षाचा यश भुजंग आईसोबत राहत असून वडिलांचा मृत्यू झाला आहे. यश हा २१ डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घराच्या अंगणात खेळत होता. काही वेळाने मुलगा यश अंगणात दिसेनासे झाल्यानंतर, आईसह नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता, मिळून आला नाही. अखेर उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व नातेवाईक यश याचा शोध घेत असताना तब्बल सात दिवसा नंतर रविवारी परिसरातील बंद कुकर कंपनीच्या उघड्या नाली चेंबर मध्ये यशाचा मृतदेह सापडला. याप्रकाराने परिसरात एकच खळबळ उडून घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे. नालीचे उघडे चेंबर ठेवणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी घटनास्थळी घाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला. घातपाताचा संशय व्यक्त होत असल्याने, मुलाचा मृतदेह मुंबईच्या जे जे रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली. जे जे रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर, पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले. तसेच पोलीस अधिक चौकशी करीत असल्याचे म्हणाले.