शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे वगळण्याबाबत भाजपाची भूमिका बदलली?

By admin | Updated: February 22, 2016 00:37 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे पुन्हा वगळण्याबाबत सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दुवा म्हणून मध्यस्थाची भूमिका वठवणाऱ्या

चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे पुन्हा वगळण्याबाबत सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दुवा म्हणून मध्यस्थाची भूमिका वठवणाऱ्या आमदार-खासदारांनी अद्याप भेट घडवून न आणल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी भेट होत नसल्याने या विषयावर भाजपाची भूमिका बदलल्याची चर्चा येथे आहे. या २७ गावांत भाजपाचे राजकीय अस्तित्व नसल्याने संघर्ष समितीला गावे वगळण्याची हमी देऊन बहिष्कार उठवण्यास राजी करून पालिकेच्या निवडणुका लढवण्यात आल्या. त्या पार पडल्या. भाजपाने सात सदस्य पदरात पाडून घेतले. निवडणुकीपूर्वी गावे लगेचच बाहेर काढण्याचे आश्वासन देणारी भाजपा आता चार महिन्यांत कोणतीही हालचाल करीत नसल्याचे पाहून हा पक्ष संघर्ष समितीला झुलवत ठेवून फसवणूक करीत असल्याची भावना या गावांतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करीत असणारे खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, किसन कथोरे, गणपत गायकवाड आणि रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट व्हावी, यासाठी संघर्ष समितीने स्मरणपत्र दिले आहे. मात्र, अद्याप भेटीला मुहूर्त मिळत नसल्याने संशयाचे वातावरण आहे. १ जून २०१५ च्या शासकीय अधिसूचनेनुसार पालिकेत २७ गावांचा समावेश झाल्यानंतर ७ सप्टेंबरला पुन्हा ही गावे वगळण्यासाठी शासकीय अधिसूचना काढली गेली. ती काढताना आधीची समावेशाबाबतची अधिसूचना रद्द करण्यात आली नव्हती किंवा ७ सप्टेंबरच्या गावे वगळण्याच्या अधिसूचनेत तसा उल्लेख नव्हता. (वार्ताहर)मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्याबाबत २७ गावांतील ग्रामस्थांना जाहीर आश्वासन दिलेले आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. मात्र, जास्त वेळ घालवायला नको. कारण, हा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे.- चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीमुख्यमंत्री सतत दौऱ्यावर असल्यामुळे वेळ मिळू शकला नाही. परंतु, लवकरच समितीची त्यांच्यासोबत भेट होईल. भारतीय जनता पक्ष संघर्ष समितीच्या पाठीशी असून गावे वगळण्यासाठी आम्ही एकत्र आहोत.- नरेंद्र पवार, आमदार