उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभेत भाजप विरुद्ध शिंदेसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:15 IST2026-04-29T18:15:36+5:302026-04-29T18:15:36+5:30

भाजपच्या समिती सदस्यांनी शिंदेसेनेच्या बाजूने मतदान केल्याने भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

BJP vs Shinde Sena in Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee meeting | उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभेत भाजप विरुद्ध शिंदेसेना

उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभेत भाजप विरुद्ध शिंदेसेना

उल्हासनगर: महापालिका स्थायी समिती सभेत भाजपाने कंत्राटी कामगारांच्या ठरावाला मुदतवाढ न देता पुन्हा निविदा काढण्याची मागणी अधिकाऱ्यांना केली. मात्र स्विपिंग मशीन ठरवाच्या बाजूने, शिंदेसेने सदस्या सोबत भाजपचे शेरी लुंड यांनी पक्ष ध्येयधोरण विरोधात जाऊन मतदान केल्याने, ठराव मंजूर झाला. या प्रकाराने भाजपातील अंतर्गतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

 उल्हासनगर महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी ८-८ असे संख्याबळ आहे. सभापती पद शिंदेसेनेच्या कलवंत सहोता यांच्याकडे आहे. सभेत वाहतूक ट्रॅफिक वॉर्डन, सुरक्षा रक्षक, माळी आणि मजूर यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणे व त्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, भाजपने या ठरावाला कडाडून विरोध केला. भाजपच्या या पवित्रा घेतल्यामुळे कंत्राटी कामगारांचा प्रश्न आता रेंगाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

शहरातील रस्त्यांच्या साफसफाईसाठी महापालिकेने दोन स्विपिंग मशिन्स आणि दोन पाणी फवारणी मशिन्स खरेदी केल्या आहेत. या मशिन्सच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ न देता नवीन निविदा काढण्याची मागणी भाजपने स्थायी समिती सभेत लावून धरली होती. मात्र, जेव्हा हा ठराव सभापती कलवंत सहोता यांनी मतदानासाठी टाकला. तेव्हा अनपेक्षित निकाल समोर आला असून ठरावाच्या बाजूने १६ पैकी ९ मते पडली. भाजपचे सदस्य शेरी लुंड यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन शिंदेसेनेच्या बाजूने मतदान केले. यामुळे हा ठराव मंजूर झाला असलातरी, भाजपची मोठी नाचक्की झाली आहे. 

स्थायी समिती सभेत जे घडले त्याबद्दल तीव्र नाराजी आहे. पक्षाच्या धोरणांविरोधात जाऊन पक्षाचे शेरी लुंड यांनी मतदान करणे चुकीचे आहे. याबाबत योग्य विचार केला जाईल.  (राजेश वधारिया, जिल्हाध्यक्ष व गटनेते, भाजप) 

कोण आहेत शेरी लुंड?

शेरी लुंड यांची राजकीय वाटचाल शिवसेनेतून झाली. तर वडील गोविंदराम लुंड हे माजी आमदार पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक होते. दरम्यान त्यांनी साई पक्षात प्रवेश करून स्वतःसह वाहिनी कांचन लुंड हे नगरसेवक पदी निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून कुटुंबातील भाऊ अमर लुंड, भावजय कांचन लुंड व शेरी लुंड नगरसेवक पदी निवडून आले. भाजप सरकारने त्यांच्यावर विश्वास दाखवून अमर लुंड यांना उपमहापौर पदही बहाल केले आहे. असे असतानाही शेरी लुंड यांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याने उल्हासनगर भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : उल्हासनगर महानगरपालिका: स्थायी समिति की बैठक में भाजपा बनाम शिंदे सेना

Web Summary : भाजपा ने ठेका कर्मचारी विस्तार का विरोध किया, लेकिन एक पार्टी सदस्य ने शिंदे सेना के साथ मतदान कर प्रस्ताव पारित कर दिया। भाजपा का आंतरिक संघर्ष उजागर।

Web Title : Ulhasnagar Municipal Corporation: BJP vs. Shinde Sena in Standing Committee Meeting

Web Summary : BJP opposed contract worker extension, but a party member voted with Shinde Sena, passing the resolution. Internal BJP conflict exposed.