दादोजी कोंडदेव क्रिडागृहात भिकारी, मजुरांची राहण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:56 PM2020-03-30T16:56:55+5:302020-03-30T16:57:07+5:30

महापालिकेने विविध ठिकाणी उभारले निवारा केंद्र

Beggars, laborers stay at Dadoji Kondadev playground | दादोजी कोंडदेव क्रिडागृहात भिकारी, मजुरांची राहण्याची सोय

दादोजी कोंडदेव क्रिडागृहात भिकारी, मजुरांची राहण्याची सोय

Next

ठाणे : कोरोनाच्या वाढता प्रार्दभाव लक्षात घेऊन देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे भिकारी, रोजदांरीवर काम करणारे कामगार, बेघर, मजुर आदींच्या वास्तव्यासाठी ठाणो महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडा गृहात तब्बल 220 नागरीकांना स्टेशन तसेच शहरातील इतर भागातून आणून त्यांना याठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पालिका स्वत:च्या तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करीत आहे. तसेच शहरातील महापालिकेच्या शाळांमधील असंख्य वर्ग खोल्यादेखील यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
ठाणो महापालिकेच्या माध्यमातून तसेच पोलिसांच्या मदतीने या सर्व मजुर, कामगार, भिकारी यांचे लॉकडाऊनच्या काळात हाल होऊ नयेत या उद्देशाने पालिकेने ही पावले उचलली आहेत. त्या अनुंषगाने पालिकेने शहरातील दादोजी कोंडेदव क्रिडागृहात तब्बल 220 नागरीकांची या पध्दतीने व्यवस्था केली आहे. त्यांना चहा, नाष्टा, जेवण आदींचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे महापालिका आयुक्त विजय सिघंल यांच्या निर्देशानुसार ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तसेच शहरातील 9 प्रभाग समिती हद्दीमधील महापालिका शाळांच्या वर्गखोल्याही यासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत असलेल्य टेंभी नाका शाळा क्र.5 च्या 8 वर्ग खोल्या, राबोडी शाळा क्र.11 मध्ये 15, शाळा क्र.37 मध्ये 07, कोपरी शाळा क्र. 17 मध्ये 07, पारशीवाडी शाळा क्र. 34 मध्ये 10, परबवाडी शाळा क्र. 18 मध्ये 08, घोलाईनगर - 11, आनंद नगर 08, आतकोनेश्वर नगर 07, कळवा 20, विटावा 18 वर्ग खोल्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये शाळा क्र. 78 मध्ये 08, शाळा क्र. 124 मध्ये 15, शाळा क्र.13 व 75 मध्ये 23 वर्ग खोल्या, तर  वागळे प्रभाग समितीत शाळा क्र. 21 मध्ये 51, शाळा क्र. 42 मध्ये 23, शाळा क्र. 32 मध्ये 10, शाळा क्र. 39 मध्ये 12, शाळा क्र. 94 मध्ये 08, दिवा शाळा क्र. 79 मध्ये 11, शाळा क्र. 26 मध्ये 14, 87 मध्ये 10, 85 मध्ये 08, 91 मध्ये 08, 31 आणि 12 मध्ये 60 वर्ग खोल्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत 43 मध्ये 09, शाळा क्र.60 मध्ये 21, शाळा क्र. 52 मध्ये 10, शाळा क्र. 25 मध्ये 21, 55 मध्ये 07, 61 मध्ये 15, 62 मध्ये 11, 128 मध्ये 16, 07 मध्ये 12, 44 मध्ये 24, 65 मध्ये 08, 47 मध्ये 12, 120 मध्ये 24, 46 मध्ये 11 आणि शाळा क्र. 95 मध्ये 19 वर्गखोल्या ठेवण्यात आल्या आहेत.
याशिवाय प्रत्येक प्रभाग समितीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यांच्याच देखरेखेखाली या ठिकाणी येणा:या प्रत्येकाच्या निवा:याची सोय करतांना त्यांना खाने, पिणो दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

Web Title: Beggars, laborers stay at Dadoji Kondadev playground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.