शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर रेल्वे प्रवाशांवर लोखंडी वस्तूने हल्ला, प्रवासी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 23:20 IST

अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणा-या बदलापूर रेल्वेवर गेल्या दोन दिवसांपासून काही अज्ञातांकडून लोखंडी वस्तू फेकून मारल्याच्या घटना समोर येत आहेत. गे

बदलापूर : अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणा-या बदलापूर रेल्वेवर गेल्या दोन दिवसांपासून काही अज्ञातांकडून लोखंडी वस्तू फेकून मारल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या दोन हल्ल्यात दोन प्रवासी जखमी झाले असून, मंगळवारी रात्री विनय कटारे या प्रवाशाच्या हातावर लागलेल्या लोखंडी वस्तूने त्यांच्या हातावर मोठी जखम झाली. त्यांच्या हाताला पंधरा टाके पडले आहेत. बदलापूर रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, या विरोधात रेल्वे पोलिसांनी तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.डोंबिवली येथून बदलापूर येथे रेल्वेने प्रवास करणारे विनय कटारे हे मंगळवारी रात्री डोंबिवली रेल्वे स्टेशनहून बदलापूर लोकलमध्ये चढले होते. मात्र बदलापूर स्टेशनजवळ लोकल येत असताना अंधारातून एक लोखंडी वस्तू त्यांच्या हातावर लागली. या हल्ल्यात विनय यांच्या हातावर मोठी जखम झाली. त्यांचा रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही जखमी एवढी गंभीर होती की त्यांच्या हाताला पंधरा टाके पडले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्टेशनजवळ ही ट्रेन आली असता, अंधारातून भिरकवलेली लोखंडी वस्तू एका प्रवाशावर भिरकवली होती.या हल्ल्यात त्या प्रवाशाच्या हाताच्या बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत बदलापूर रेल्वे स्टेशनवर येणा-या लोकलमधील प्रवाशांवर लोखंडी वस्तू फेकून मारल्याच्या दोन घटनांमध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटना वाढत असताना रेल्वे पोलीस मात्र रुळांच्या बाजूला असलेल्या भागात पेट्रोलिंग करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. तर याबाबत रेल्वे पोलिसात आपण तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता, कल्याण येथे जाऊन तक्रार करण्यास सांगितल्याचे विनय यांनी सांगितले. त्यामुळे या घटनांवर योग्य वेळीच नियंत्रण आणत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.