शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांच्या गोण्यांत निकृष्ट सिमेंट

By admin | Updated: January 24, 2017 05:49 IST

सिमेंटची वाहतूक करताना रेल्वेच्या डब्यांमध्ये पडणारे निकृष्ट दर्जाचे सिमेंट मातीमोल भावात विकत घेऊन ते नामांकित कंपन्यांच्या

ठाणे : सिमेंटची वाहतूक करताना रेल्वेच्या डब्यांमध्ये पडणारे निकृष्ट दर्जाचे सिमेंट मातीमोल भावात विकत घेऊन ते नामांकित कंपन्यांच्या नावे विकणाऱ्या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.मालगाडीने सिमेंटची वाहतूक करताना डब्यांमध्ये सिमेंट जमा होते. याशिवाय, रेल्वेच्या गोदामांमध्ये सिमेंटच्या गोण्या उतरवताना प्लॅटफॉर्मवरही सिमेंट पडते. ते निकृष्ट दर्जाचे असल्याने रेल्वे प्रशासन मातीमोल भावात विकते. रेल्वेकडून विकत घेतलेले हे सिमेंट नामांकित कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरून ते बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचा गोरखधंदा बाळकुम परिसरातील एका गोदामात सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी करून गोदामावर धाड टाकली. आरोपींचा हा गोरखधंदा एका भाड्याच्या गोदामात सुरू होता. बाळकुम परिसरातील हे गोदाम राजेश भोईर यांच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)