शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता विभागाचा अजब कारभार

By admin | Updated: January 5, 2017 05:37 IST

महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही.

भिवंडी : महापालिकेच्या मालमत्ता विभागात शहरातील बऱ्याच पालिकेच्या मालमत्तेची नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. बांधकाम विभागाने पालिकेची मालमत्ता हस्तांतरीतच केलली नाही. अशा स्थितीत मालमत्तेच्या नोंदीची शहानिशा न करता दरवर्षी आॅडिट होत आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेच्या सर्व प्रकारच्या स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद मालमत्ता विभागात होणे अपेक्षित असताना केवळ पालिकेच्या काही इमारतींची नोंद केलेली आहे. शहरातील पालिकेच्या इमारती बांधकाम विभागाकडून बांधल्या जातात. मात्र या इमारतींची मालमत्ता विभागाकडे नोंदच केली जात नाही. काही वर्षापूर्वी एमएमआरडीच्या निधीतून स्वच्छतागृहे बांधण्यात आली. त्यानंतर या वास्तूंचा वापर करण्याच्या निमित्ताने आरोग्य विभागाकडे सोपविणे गरजेचे असताना त्या स्वत:कडे ठेऊन गैरकारभार केला. हा गैरकारभार उघडकीस आल्यानंतर ही स्वच्छतागृहे पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र या वास्तू पालिकेच्या असतानाही त्याची नोंद मालमत्ता विभागाकडे नाही.पालिका आर्थिक संकटात असताना त्यासाठी नगरसेवक वा प्रशासनाने कोणताही ठोस मार्ग न काढता पालिकेची मालमत्ता गहाण ठेवण्याकडे लक्ष वेधले आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र हे करताना मालमत्ता अधिकाऱ्यांचा शेराही घेतलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या निवासांबाबतची नोंद मालमत्ता विभागाकडे होत नाही. (प्रतिनिधी)