शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

By admin | Updated: October 8, 2015 00:11 IST

वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रासह दोघांनी मद्य प्राशन करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कोपरी भागात घडला.

ठाणे : वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रासह दोघांनी मद्य प्राशन करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कोपरी भागात घडला. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्याच्या विवाहित चुलत बहिणीनेही कपडे काढून आपणाला मारहाण केल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच कोपरी पोलिसांनी आरोपींना मदत करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक केली आहे.पिडीत तरुणीचा वसंत विहार येथील मित्र कौस्तुभ चव्हाण (२१) याने वाढदिवसाची पार्टी देण्याचे कारण सांगून ३० सप्टेंबर रोजी मोटारसायकलवरुन कोपरीतील आपल्या चुलत बहिणीच्या घरी नेले. तिथे त्याच्या त्या बहिणीने मुलीला मारहाण करुन तिचे कपडे काढले. त्यानंतर दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वा. च्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत कौस्तुभ आणि मंदार ठाकूर (३०) या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. भीतीपोटी तिने हा प्रकार घरी सांगितलाच नाही. ५ आॅक्टोंबरला तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे वैद्यकीय तपासणीत हा प्रकार उघड झाला. अखेर घडलेला प्रकार तिने आई वडिलांना सांगितला. हा प्रकार कळल्यानंतर धक्काच बसलेल्या तिच्या पालकांनी तातडीने कोपरी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी रात्री ११ वा. च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ६ आॅक्टोंबर रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास कौस्तुभ, मंदार आणि कौस्तुभची बहिण अशा तिघांना अटक केली. या तिघांनाही ठाणे न्यायालयाने ९ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कौस्तुभ नवी मुंबईतील एका महाविद्यालयात डिप्लोमा करीत आहे. तर पिडीत मुलगी ठाण्यातील एका शाळेत दहावीला आहे. आधी दोघेही एकाच शाळेत असल्यामुळे त्यांची मैत्री होती. मात्र, याच मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती कोपरी पोलीसांनी दिली. (प्रतिनिधी)