"आप बहुत ही...!"; AIMIM ची तरुण नगरसेवक सहर शेखला असदुद्दीन ओवेसींचा 'खास' मेसेज, नेमकं काय म्हणाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:50 IST2026-01-22T17:50:25+5:302026-01-22T17:50:57+5:30

...याशिवाय माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही फोन करून शुभेच्छा दिल्या. पक्षाकडून मोठा पाठिंबा मिळाला, असेही सहर शेखने म्हटले आहे. 

Asaduddin Owaisi's message to AIMIM's young corporator Sahar Sheikh, what exactly did he say | "आप बहुत ही...!"; AIMIM ची तरुण नगरसेवक सहर शेखला असदुद्दीन ओवेसींचा 'खास' मेसेज, नेमकं काय म्हणाले? 

"आप बहुत ही...!"; AIMIM ची तरुण नगरसेवक सहर शेखला असदुद्दीन ओवेसींचा 'खास' मेसेज, नेमकं काय म्हणाले? 

महाराष्ट्रात पार पडेल्या महानगरपालिका निवडणुकीत ठाण्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून 'एआयएमआयएम'ची (AIMIM) २५ वर्षीय तरुण उमेदवार सहर शेख विजयी झाली आहे. या विजयानंतर पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तिला वैयक्तिक मैसेज करून तिचे कौतुक केले आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, "ते व्यस्त होते, यामुळे फोन करू शकले नाही, परंतु त्यांनी मेसेज केला की, "तू एका अतिशय धाडसी वडिलांची धाडसी मुलगी आहेस. भविष्यात आणखी चांगले करण्यासाठी शुभेच्छा." हा संदेश वाचून अत्यंत आनंद झाला."

याशिवाय माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही फोन करून शुभेच्छा दिल्या. पक्षाकडून मोठा पाठिंबा मिळाला, असेही सहर शेखने म्हटले आहे. 

विजयासंदर्भात काय म्हणाली सहर शेख -
आपल्या विजयाबद्दल बोलताना सहर शेख म्हणाली, "लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि गेल्या ६-७ वर्षांत आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. एका अर्थाने, मी नेहमीच असे मानते की माझ्या कार्यालयात मदतीसाठी येणाऱ्या सर्व लोकांनी प्रथम अल्लाहचे दार ठोठावले, नंतर अल्लाहने त्यांना माझा पत्ता दिला आणि त्यानंतरच ते माझ्या कार्यालयापर्यंत पोहोचले. मी कधीही कोणालाही निराश केले नाही. मी कधीही असे म्हटले नाही की, एखाद्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही. जर मी ते करू शकलो नाही, तर मी माझ्या संपर्कांचा वापर करून इतरांद्वारे त्यांना मदत केली."


 

Web Title : AIMIM की युवा पार्षद सहर शेख को असदुद्दीन ओवैसी का संदेश!

Web Summary : AIMIM की 25 वर्षीय सहर शेख ने ठाणे का नगरपालिका चुनाव जीता। असदुद्दीन ओवैसी ने उन्हें संदेश भेजा, उनके साहस की सराहना की और शुभकामनाएं दीं। पूर्व सांसद इम्तियाज जलील ने भी उन्हें बधाई दी और पार्टी का पूरा समर्थन देने का वादा किया।

Web Title : AIMIM's young corporator Sahar Shaikh gets message from Asaduddin Owaisi!

Web Summary : AIMIM's 25-year-old Sahar Shaikh won Thane's municipal election. Asaduddin Owaisi messaged her, praising her courage and wishing her well. Former MP Imtiaz Jaleel also congratulated her, promising full party support.