Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:10 IST2026-05-14T13:09:08+5:302026-05-14T13:10:03+5:30

Ritual: निरोगी शरीर आणि उत्तम पचनासाठी या श्लोकाचा अर्थ आणि विज्ञानावर आधारित महत्त्व जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!

Ritual: Reciting this verse before meals will break your habit of overeating! | Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!

Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!

आजच्या धावपळीच्या काळात आपण टीव्ही किंवा मोबाईल बघत घाईघाईने जेवतो. यामुळे किती आणि काय खाल्ले याचे भान राहत नाही, परिणामी 'ओव्हरईटिंग' (Over-eating) होऊन पचनाच्या तक्रारी सुरू होतात. आपल्या पूर्वजांनी शिकवलेला एक साधा श्लोक केवळ संस्कार नसून ते एक उत्तम 'डाएट मॅनेजमेंट' आहे. श्लोकाचा अर्थ अगदी सोपा आहे, पण त्यामुळे अति सेवन करण्याची सवय कशी मोडेल ते जाणून घेऊ. 

धुवा हात पाय, चला भोजनाला 
बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला,
नका मागू काही आधाशीपणाने 
नका टाकू काही करा स्वच्छ पाने 

या श्लोकातील प्रत्येक ओळ तुमच्या आरोग्यासाठी कशी काम करते, हे खालीलप्रमाणे पाहूया:

१. धुवा हात पाय, चला भोजनाला (स्वच्छता आणि मानसिक तयारी)

जेवणापूर्वी हात आणि पाय धुण्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते. विज्ञानानुसार, हात-पाय धुण्याने मेंदूला आपण जेवणार आहोत असा संकेत मिळतो, ज्यामुळे लाळ आणि पाचक रसे स्रवण्यास सुरुवात होते. ही प्रक्रिया पचनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

२. बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला (सुखासन आणि पचन)

'मांडी घालून बसणे' हे एक प्रकारचे योगिक आसन (सुखासन) आहे. खाली बसून जेवताना जेव्हा आपण घास घेण्यासाठी पुढे झुकतो आणि पुन्हा सरळ होतो, तेव्हा पोटाच्या स्नायूंची हालचाल होते. यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पचनक्रिया सुधारते. आजकाल ऑफिसमध्ये किंवा खुर्चीवर बसून जेवतानाही आपण ताठ बसून जेवल्यास त्याचे फायदे नक्कीच मिळतात.

३. नका मागू काही आधाशीपणाने (माईंडफुल इटिंग)

'आधाशीपणा' म्हणजेच अधाश्यासारखे किंवा हव्यासापोटी खाणे. जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो, तेव्हा आपण मनाला 'शांतीने खा' असा संदेश देतो. जेवताना घाई न केल्याने मेंदूला पोट भरल्याचा संकेत (Satiety Signal) वेळेत मिळतो, ज्यामुळे आपण जास्त खाणे (Over-eating) टाळतो.

४. नका टाकू काही करा स्वच्छ पाने (कृतज्ञता आणि शिस्त)

ताटात काहीही न टाकणे म्हणजे अन्नाचा आदर करणे. जेवताना ताटात कमी वाढून घेणे आणि हवे असल्यास पुन्हा मागून घेणे, ही शिस्त आपल्याला आहार नियंत्रणात मदत करते. जेव्हा आपण 'पान स्वच्छ' करण्याचा संकल्प करतो, तेव्हा आपण ताटात गरजेपुरतेच अन्न घेण्याची सवय लावून घेतो.

जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि खाली बसणे शक्य नसेल, तरीही जेवणापूर्वी ३० सेकंद डोळे मिटून शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा आणि केवळ आपल्या जेवणाकडे लक्ष केंद्रित करा. यालाच 'माईंडफुल इटिंग' म्हणतात, जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन मानले जाते.

थोडक्यात: हा श्लोक म्हणजे जेवणापूर्वीचा एक 'पॉज' (Pause) आहे, जो तुम्हाला अन्नाशी जोडतो आणि अनावश्यक खाण्यापासून वाचवतो.

Web Title : भोजन से पहले की प्रार्थना अधिक खाने की आदत तोड़े।

Web Summary : भोजन से पहले की प्रार्थना स्वच्छता, उचित आसन और कृतज्ञता को बढ़ावा देकर सचेत खाने की आदतों को प्रोत्साहित करती है। यह पाचन में सहायता करता है, तृप्ति का संकेत देकर अधिक खाने से रोकता है, और भाग नियंत्रण के लिए एक अनुशासित दृष्टिकोण को बढ़ावा देता है।

Web Title : Pre-meal prayer breaks overeating habit, promotes mindful eating.

Web Summary : A pre-meal prayer encourages mindful eating habits by promoting cleanliness, proper posture, and gratitude. It aids digestion, prevents overeating by signaling fullness, and fosters a disciplined approach to portion control, contributing to weight management and healthier eating.