शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सेना-संघर्ष समिती सामना जाहीर

By admin | Updated: October 16, 2015 01:56 IST

निवडणूक बहिष्कारावर सुरुवातीपासून ठाम असणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण समितीने शेवटच्या दिवशी ऐन वेळी गनिमी कावा करून भाजपाच्या आदेशाने उमेदवारी दाखल केली आहे

अरविंद म्हात्रे, चिकणघरनिवडणूक बहिष्कारावर सुरुवातीपासून ठाम असणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण समितीने शेवटच्या दिवशी ऐन वेळी गनिमी कावा करून भाजपाच्या आदेशाने उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच निवडणूक लढविण्याचा मानस असला तरी ६ ते १२ आॅक्टोबरपर्यंत एकही अर्ज दाखल केला नसल्याने बहिष्काराला शिवसेना साथ देण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, समितीला गाफील ठेवण्याची रणनीती खेळणाऱ्या शिवसेनेलासुद्धा ऐनवेळी उमेदवारी दाखल करून समितीनेही धक्का दिला आहे. १२ तारखेलाच शिवसेनेने डोंबिवली आणि कल्याणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात १२२ जागा लढविण्याचे जाहीर केले, तेव्हा समितीनेही त्यांना शह देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा मार्ग स्वीकारला. आजघडीला २७ गावांत २१ प्रभागांत केवळ १९ प्रभागांतच निवडणूक होणार आहे. दोन प्रभागांत बहिष्कार कायम आहे. तर, १०५ या प्रभागातील उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.>>> शिवसेनेने २७ गावांतून १९ प्रभागांत अर्ज भरले आहेत. कुणालाच उमेदवारी भरू न देणारी समिती सुरक्षा यंत्रणेपुढे नरमली आणि उमेदवारी दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर तिनेही १९ प्रभागांत समांतर अर्ज दाखल करून शिवसेनाविरुद्ध समिती अशा सरळ लढतीचे संकेत दिले. मात्र, तरीही बहिष्कारासाठी समिती शिवसेनेची विविध माध्यमांनी मनधरणी करीत आहे. बसपानेही सर्व जण अर्ज मागे घेणार असतील तर आम्ही मागे घेऊ, असे जाहीर केले आहे. मात्र, आधी कोण अर्ज मागे घेणार, यावरून घोडे अडू शकते. शिवसेना म्हणते, आधी समितीने मागे घ्यावे, पण समितीने सर्व अर्र्ज मागे घेतले आणि शिवसेनेने नाही घेतले तर, अशी धाकधूक समिती व्यक्त करीत असून यावर सर्वांनी एकत्र येऊन अर्ज मागे घेण्यास जावे, असा समितीचा तोडगा आहे. पण, शिवसेना ते मागे घेण्यास अनुकूल नाही. तसे झाले तर शिवसेना आणि समिती यांच्यात सरळ सामना बघायला मिळेल. समितीचे पदाधिकारी रात्रंदिवस गावांत फिरून प्रचार करीत आहेत. निवडणूक जर झालीच तर २ नोव्हेंबरला आचारसंहिता संपल्यावर गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग, निवडणूक लढवून श्रम आणि पैसा का वाया घालवायचा, हा मुद्दा २७ गावांतील ग्रामस्थांना पडला आहे.