शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या नातलगांना २ लाखांची मदत जाहीर

By admin | Updated: June 25, 2016 01:43 IST

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत महिन्याभरापूर्वी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा व जखमींवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

डोंबिवली : डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत महिन्याभरापूर्वी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा व जखमींवरील वैद्यकीय उपचाराचा खर्च जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लगेच देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट करून जाहीर केला. ‘लोकमत’ने डोंबिवलीत शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात त्याच स्फोटातील मृत व जखमींना अद्याप मदत मिळाली नसल्याचा मुद्दा लावून धरला होता. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वट केल्याची माहिती भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आणि दुर्घटनाग्रस्तांना दिलासा मिळाला.
स्फोटातील मृतांचे नातलग मदतीपासून वंचित असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या ‘हॅलो’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध केले. डोंबिवलीतील ‘बालभवन’मध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात ‘डोंबिवलीतील स्फोट : महिन्याभरानंतर...’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सुशांत कांबळे यांची पत्नी सोनल हजर होत्या. आपल्या दीड वर्षांच्या मुलाच्या पालनपोषणाचा प्रश्न कसा आ वासून उभा आहे, ही व्यथा त्यांनी साश्रू नयनांनी मांडताच उपस्थित हेलावले. मृतांचे नातलग, जखमी आणि नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी उपस्थितांनी केली. त्याचवेळी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या टिष्ट्वटची माहिती देताच उपस्थितांनी टाळ््यांचा कडकडाट केला.
यावेळी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, ‘वनशक्ती’चे अश्वीन अघोर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुुभाष तुपे, ‘कामा’ संघटनेचे प्रतिनिधी व उद्योजक एन. व्ही. भागवत, सभागृह नेते राजेश मोरे, वास्तूविशारद राजीव तायशेट्टये, जागरुक नागरिक राजू नलावडे, ‘लोकमत’चे उप सरव्यवस्थापक राघवेंद्र शेट आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला स्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता कोणत्या उपाययोजना करता येतील याची चर्चा यावेळी झाली. श्रोत्यांनी एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक, आमदार, महापौरांना विविध विषयांवर थेट सवाल केले. चर्चेचे सूत्रसंचालन ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी केले. (सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात)