शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पंचायत समितीवर संतप्त महिलांचा आक्रोश

By admin | Updated: May 13, 2017 00:52 IST

विहिरींचे पाण्याचे स्रोत आटल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेढ्याचीवाडी येथील महिलांनी गुरुवारी

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : विहिरींचे पाण्याचे स्रोत आटल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेढ्याचीवाडी येथील महिलांनी गुरुवारी थेट पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला धडक देऊन पाण्यासाठी आक्रोश केला. तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाच्या काहिलीमुळे तालुक्यातील विहिरीतील पाण्याने तळ गाठायला सुरु वात केली. या पाड्यावर दोन विंधण विहिरी आहेत. परंतु, आता त्यातून पाणी येणे बंद झाल्याने ग्रामस्थांची अडचण होते आहे. या वाडीची वस्ती ३०० च्या आसपास आहे. मात्र, पाणीपुरवठा होत नसल्याने येथील महिलांनी शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागावर धडक दिली आणि तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर, संतप्त महिलांनी आपला मोर्चा तहसील कचेरीकडे वळवला. तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच टँकर सुरू करण्यात येतील, असे सांगितले.