शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
3
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
4
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
6
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
7
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
8
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
9
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
11
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
12
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
13
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
14
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
15
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
16
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
17
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
18
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
19
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
20
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

अंबरनाथ पालिका निवडणूक : दिग्गजांना शोधावा लागणार प्रभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:45 AM

आरक्षण सोडतीचा बसला फटका, स्थलांतरित होण्याची आली वेळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीत सर्वच दिग्गज नगरसेवकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता इतर प्रभागात स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोण जाणार यावर चर्चा रंगली आहे.अंबरनाथ नगरपालिकेत ५७ प्रभागांची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. प्रथम अनुसूचित जातीच्या आठ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फटका हा नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या बालाजीनगर प्रभागावर पडला. तसाच परिणाम माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या भास्करनगर भागालाही बसला आहे. या सोबत काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांचा प्रभागही महिलांसाठी राखीव झाला आहे. असाच फटका राष्ट्रवादीचे गटनेते सदाशिव पाटील यांना बसला आहे. त्यांचा प्रभागही महिला राखीव झाल्याने त्यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. दिग्गजांमध्येच शिवसेनेचे गटनेते राजू शिर्के यांचा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. पंढरीनाथ वारिंगे, सचिन पाटील, रवींद्र पाटील, भरत फुलोरे, उमेश गुंजाळ, उमेश पाटील, मिलींद पाटील आणि कुप्पन आनंद कन्नन यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. तर काही नगरसेवकांचे प्रभाग हे आरक्षणात बाधित झाले आहेत. त्यात वसंत पाटील, करुणा रसाळ, श्रुती सिंह, वृषाली पाटील, उमर इंजिनियर, शेख शरीफा, कल्पना गुंजाळ, सुभाष साळुंके, जयश्री पाटील आणि योगिता वारिंगे या नगरसेवकांना जातीच्या आरक्षणाचा फटका बसला आहे.अनके दिग्गजांना आता आरक्षण सोडतीनंतर दुसऱ्याच्या प्रभागात जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे मनीषा वाळेकर, प्रदीप पाटील, राजेंद्र वाळेकर, निखील वाळेकर, सादाशिव पाटील, उमेश पाटील, प्रज्ञा बनसोडे, राजू शिर्के, सुभाष साळुंके, अशोक गुंजाळ, सचिन पाटील, उमेश गुंजाळ या सारखे नगरसेवक कोणत्या प्रभागात उडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लॉटरी लागलेले उमेदवारआरक्षण सोडतीत अनेकांच्या वाट्याला निराशा आलेली असतांना काही प्रभाग दिग्गज उमेदवारांसाठी लाभदायक ठरले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ४ मध्ये चरण रसाळ, प्रभाग क्रमांक ३० स्वामीनगर येथे अब्दुल शेख, प्रभाग क्रमांक १५ चिंचपाडा मध्ये कबीर गायकवाड यांच्यासाठी प्रभाग आरक्षित झाला आहे. तर स्टेशन विभाग शिवदर्शन बंगला परिसराचा प्रभाग हा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासाठी पुन्हा खुला झाला आहे. तर खेर सेक्शन हा प्रभाग पुरुषोत्तम उगले यांच्यासाठी खुला झाला आहे.