शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी; भाजपाही काढणार वचपा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 12:39 AM

अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेनेची या दोन्ही नगरपालिकांत सत्ता असून महाविकास आघाडीतील सेना हा महत्त्वाचा घटक असल्याने दोन्हीकडील सत्ता राखण्याचा शिवसेना कसोशीने प्रयत्न करील. या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळाचा नारा देऊन आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पंकज पाटील, अंबरनाथसत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचे गणित जुळवणे आता सुरू झाल्याचे चित्र यंदाच्या पालिका निवडणुकीत दिसणार आहे. शहरात पक्षवाढीचे प्रयत्न सर्वच पक्ष करीत आहेत. जोडतोडीच्या राजकारणामुळे कोण कोणासोबत जाईल, याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे आपली ताकद सर्वाधिक वाढविण्यासाठी शहरातील सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. अंबरनाथ असो वा बदलापूर या दोन्ही शहरांत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेला शह कसा देता येईल, याचा विचार करून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सध्या मात्र निवडणूक लढवताना स्वबळाचा नारा देत आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांत आघाडी आणि युतीबाबत कोणतीही चर्चा नाही. शहरात जी काही चर्चा रंगली आहे, ती फक्त स्वबळाची. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी होणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र, स्थानिक पातळीवर सत्ता स्थापन करणे, हेच प्रत्येक पक्षाचे ईप्सित असल्याने ऐनवेळी कोणता पक्ष कुणासोबत जाणार, याची शाश्वती कोणीच देत नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडीचा धर्म बाजूला ठेवत स्वबळाची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसला शिवसेनेसोबत जाताना आपल्या अनेक इच्छुकांची मने मारावी लागतील. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात काँग्रेसच्या अनेक इच्छुकांनी लढण्याची तयारी केलेली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही पक्ष कोणत्या मुद्द्यावर एकत्रित येणार, हा प्रश्नच आहे. भाजपदेखील स्वबळाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भाजपला शिवसेनेसोबत जाणे हे वरिष्ठांच्या आदेशामुळे शक्य नाही. त्यातच भाजपची अनेक प्रभागांत लढाई शिवसेनेच्या उमेदवारासोबतच राहणार आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेसोबत जाणे शक्य होणार नाही. राष्ट्रवादीला मात्र अजूनही शिवसेनेची दारे चर्चेकरिता उघडी आहेत. राष्ट्रवादी ज्या प्रभागात इच्छुक आहेत, त्यातील एखाददुसऱ्या प्रभागातच शिवसेनेचा विद्यमान नगरसेवक आहे. शहराध्यक्ष आणि त्यांचे पुत्र ज्या प्रभागात इच्छुक आहेत, त्यातील एक प्रभाग शिवसेनेचा तर दुसरा अपक्ष उमेदवाराचा आहे. त्यामुळे त्यातील एक जागा ही राष्ट्रवादीला सोडणे शक्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाणे शक्य होणार आहे. मात्र, अंबरनाथमध्ये मनसेची अवस्था अवघडल्यासारखी झाली आहे. भाजपसोबत गेल्यास मनसेला काही प्रमाणात आधार मिळणार आहे. मात्र, भाजप स्वबळाचा नारा देत असल्याने मनसेलाही नाइलाजास्तव स्वबळाचा नारा द्यावा लागणार आहे. आजच्या घडीला सर्वच पक्ष हे स्वबळाचा नारा देत असले तरी आचारसंहिता लागल्यावर आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित झाल्यावर आघाडी आणि युतीची सूत्रे जलदगतीने फिरणार आहेत. आज स्वबळाचा नारा देणे, हे आपली ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातील काही पक्ष हे खरोखरच स्वबळावर झेप घेणारे ठरणार आहेत. काही पक्षांना त्याचा फटकादेखील बसणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचीच चर्चा आहे.

बदलापुरात परिस्थिती वेगळी नाही. तेथे शिवसेना आणि भाजप हे रिंगणातील मुख्य पक्ष आहेत. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीची ताकद शहरात आहे. मात्र, शहराची परिस्थिती पाहता बदलापुरात शिवसेना आणि भाजप यांची लढत निश्चित मानली जात आहे. मात्र, हे दोन प्रमुख पक्ष निवडणूक लढवत असताना त्या पक्षांसोबत जाऊन स्वत:चा पक्ष सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि मनसे करणार आहेत. बदलापुरात काँग्रेसची अवस्था बिकट असली, तरी आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून एखाददुसरी जागा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास इच्छुक असली, तरी शिवसेना त्यांना जवळ खेचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापुरात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार की, भाजप किंवा शिवसेनेची साथ देणार, ही चर्चा रंगली आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना राष्ट्रवादीला बाजूला सारल्यास बदलापुरात काही प्रभागांत तिरंगी लढत होणार आहे. शहरातील अनेक प्रभागांत शिवसेना आणि भाजप अशी सरळ लढतच निश्चित मानली जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसMNSमनसे