मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:13 IST2026-05-11T14:12:32+5:302026-05-11T14:13:47+5:30

SSC success story: खानिवडे येथील प्रतिभा विद्यामंदिरात शिक्षण घेणाऱ्या अद्वैतीला इयत्ता पाचवीत असतानाच कर्करोगाने ग्रासले.

Advaiti Kudu defeated death, became a 'topper in ssc exam after fighting cancer; A role model for students of determination, struggle and journey of success | मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श

मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श

पारोळ : शारीरिक वेदना, उपचारांचा कठीण प्रवास आणि अभ्यासातील खंड या सर्व संकटांवर मात करत वसई तालुक्यातल्या ग्रामीण भागातील अद्वैती कुडू हिने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या जिद्दीच्या आणि संघर्षमय यशाच्या प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

खानिवडे येथील प्रतिभा विद्यामंदिरात शिक्षण घेणाऱ्या अद्वैतीला इयत्ता पाचवीत असतानाच कर्करोगाने ग्रासले. उपचारांमुळे तिला सहावी आणि सातवीच्या नियमित शिक्षणापासून दूर राहावे लागले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही तिने अभ्यासाची साथ सोडली नाही. 

उपचार सुरू असतानाच तिने शिक्षणात खंड पडू दिला नाही. नववीत असताना पुन्हा आजाराने डोके वर काढले आणि तिला संपूर्ण वर्ष अभ्यासापासून दूर राहण्याची वेळ आली. तरीदेखील अद्वैती खचली नाही. कठोर उपचारांचा सामना करत तिने अभ्यास सुरू ठेवला. 

एकीकडे उपचारांचा वेदनादायी प्रवास आणि दुसरीकडे मुलीच्या भवितव्यासाठी आई-वडिलांची धडपड या सर्वांमधून अद्वैतीने विलक्षण मानसिक ताकद दाखवली.

९१.२० गुणांसह शाळेतून प्रथम येण्याचा मान

पेशाने शिक्षक असलेल्या आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रचंड जिद्द यांच्या जोरावर तिने पुन्हा उभारी घेतली. परिस्थितीला दोष न देता हसतमुखाने संकटांचा सामना करत अद्वैतीने दहावीची बोर्ड परीक्षा देत ९१.२० टक्के गुणांसह शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला.

अद्वैतीच्या या यशामुळे वसई तालुक्यात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तिचा संघर्षमय प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे अद्वैतीने दाखवून दिले असून, तिचा शैक्षणिक प्रवास हा अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

Web Title : अद्वैती: कैंसर को हराकर, दृढ़ संकल्प से बनी टॉपर

Web Summary : पांचवीं कक्षा से कैंसर से जूझ रही अद्वैती कुडू ने 91.20% अंकों के साथ दसवीं कक्षा में अपने स्कूल में टॉप किया। इलाज और शैक्षणिक बाधाओं को पार करते हुए, उनकी दृढ़ता वसई तालुका के छात्रों को प्रेरित करती है। उनकी सफलता दृढ़ता की शक्ति को उजागर करती है।

Web Title : Adwaiti: Cancer Survivor Becomes Topper Through Grit and Determination

Web Summary : Adwaiti Kudu, battling cancer since fifth grade, topped her school in the tenth grade with 91.20%. Overcoming treatment and academic setbacks, her resilience inspires students in Vasai taluka. Her success highlights the power of perseverance.