शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या अबोल भिंती विविध चित्रांनी झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:01 IST

कमळेवीर परिसरातील अंगणवाडीचे हे स्वरूप बदलण्याचे काम मातृसेवा संस्थेच्या संध्या सावंत आणि सुहास सामंत यांनी हाती घेतले. "कोऱ्या कागदावर काही लिहिल्याने त्याला जिवंतपणा येतो

ठळक मुद्देकमळेवीर परिसरातील अंगणवाडीचे हे स्वरूप बदलण्याचे काम मातृसेवा संस्थेच्या संध्या सावंत आणि सुहास सामंत यांनी हाती घेतले. "कोऱ्या कागदावर काही लिहिल्याने त्याला जिवंतपणा येतो

ठाणे : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा, अंगणवाड्या बंद आहेत. विद्यार्थी घरांत असल्याने विद्यार्थ्यांंची किलबिल बंद झाली आहे. २२ मार्चपासून टाळेबंदीमुळे मुलांच्या एकसुरातील आवाजामुळे दुमदुमून जाणारा शाळेचा परिसर शांत वाटतोय. पण, लवकरच ही शांतता दूर होईल. पुन्हा एकदा तो परिसर मुलांच्या किलबिलाटाने गजबजेल, असा विचार करून मातृसेवा संस्थेने लॉकडाऊनमध्ये या अबोल भिंतींना बोलके करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेने सिंधुदुर्ग येथील झाराप गावातील अंगणवाडीच्या बोलक्या  भिंती रंगवून देण्याचे आणि डागडुजीचे कार्य पूर्णत्वास नेले. त्याचे उदघाट्न शनिवारी पार पडले.

कमळेवीर परिसरातील अंगणवाडीचे हे स्वरूप बदलण्याचे काम मातृसेवा संस्थेच्या संध्या सावंत आणि सुहास सामंत यांनी हाती घेतले. "कोऱ्या कागदावर काही लिहिल्याने त्याला जिवंतपणा येतो, तसेच कोऱ्या भिंतींवर लिहिल्यानेसुद्धा भिंती बोलक्या होतात." असे संध्या म्हणाल्या. वार, रंगओळख, आकड्यांच्या मदतीने गणिताची उजळणी घेणारे फलक आणि रंगसंगतीमुळे शाळेच्या भिंती जणू विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. एवढेच नव्हे तर स्वच्छतेचे आणि बाळबाळंतिणीसाठी योग्य संदेशही भिंतीवर उमटवले आहेत. विशेष म्हणजे एक भिंत मुलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. भिंतीवर सचित्र रेखाटलेली अक्षरं, अंक व अधिक तपशील दीर्घकाळ मुलांच्या लक्षात राहतो. 

टॅग्स :thaneठाणे