शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 07:16 IST

या घटनेनंतर तिच्या मृतदेहाची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

ठाणे : पती आणि मुलाचे आजारपण, घरची बेताची परिस्थिती यातून वैफल्यग्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय महिलेने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पाेलिसांत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. 

वाघबीळ गावात राहणारी ही महिला हिरानंदानी इस्टेट येथील पेनिकल इमारतीमध्ये रुग्णाला तेल मालिश करण्यासाठी ३१  ऑक्टाेबर २०२४ राेजी सकाळी ९:२५ वाजण्याच्या सुमारास गेली हाेती.

तिने इमारतीच्या २२ व्या मजल्यावर जाऊन त्याठिकाणी असलेल्या रेफ्यूज फ्लॅटमध्ये प्रवेश करून इमारतीवरून उडी मारली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या मृतदेहाची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

सीसीटीव्ही फुटेजवरून प्रकार उघडकीसया महिलेकडे पेनिकल  इमारतीमध्ये प्रवेशाचे ॲक्सेस कार्ड हाेते. त्या कार्डच्या आधारे तिने या इमारतीमध्ये प्रवेश करून ती इमारतीच्या २२ व्या मजल्यावर गेली. या मजल्यावरील पायऱ्यांवर बसून तिने गुटख्याचे सेवन केले. रेफ्यूज फ्लॅटमध्ये प्रवेश करून उडी मारून आत्महत्या केली. प्रकार इमारतीच्या  सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाला. तिचा पती किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. मुलगा डोळ्यांच्या विकाराने ग्रस्त आहे. आत्महत्येच्या कारणाचा शाेध घेण्यासाठी तपास सुरु आहे.

टॅग्स :thaneठाणे