शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

Corona In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६११ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 22:04 IST

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६११ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली. आज सात रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २६३ झाली आहे.  
 
ठाणे शहरात १८५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६१ हजार ९३० झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३८४ झाली. कल्याण - डोंबिवलीत १७५ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६२ हजार ७८४ रुग्ण बाधीत असून एक हजार १९६ मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ८१६ झाली आहे. आतापर्यंत ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७७६ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३८ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ८ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

अंबरनाथला १२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ७७७.असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ८७२ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू आहे. आता येथील मृत्यूची संख्या १२७ आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ५०९ आणि आतापर्यंत ५९२  मृत्यूची नोंद आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे