शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवत ५० हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:44 IST

मीरा रोड : मीरा रोडच्या नयानगरमध्ये एका सराफाच्या दुकानात दोघा तरुणांनी शिरून चाकूचा धाक दाखवत ५० हजारांची रक्कम लुटली. ...

मीरा रोड : मीरा रोडच्या नयानगरमध्ये एका सराफाच्या दुकानात दोघा तरुणांनी शिरून चाकूचा धाक दाखवत ५० हजारांची रक्कम लुटली. सराफाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डोक्यात वार करून जखमी केले. आजूबाजूच्या दुकानदारांनी हिमतीने एका लुटारूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.नयानगरमध्ये अस्मिता सुपर मार्केटसमोर राजू गोल्ड नावाचे सोनेचांदीचे दुकान आहे. शनिवारी दुकानमालक सिद्धार्थ जैन हे वडील गावी गेले असल्याने एकटेच होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुकानातून दोघेजण शिरले व शटर बंद केले. एकाने चाकूचा धाक दाखवत ५० हजारांची रक्कम काढून घेतली. जैन यांनी प्रतिकार केला असता दुसऱ्याने हातातील मोठा पाना डोक्यात मारून त्यांना जखमी केले.जैन यांच्या दुकानाचे शटर बंद झाल्याचे व आतून आवाज येत असल्याचे कळताच शेजारी दुकानदार तन्वीर कुरेशी व मोहसीन कुरेशी, भागाराम चौधरी, अमजद यांनी मदतीसाठी धाव घेत दुकानाचे शटर उघडले. तोच चाकू हातात असलेला एक लुटारू रक्कम घेऊन पळून गेला. त्याच्या साथीदारास मात्र त्या दुकानदारांनी धाडसाने पकडले. गस्त घालत असलेले नयानगर पोलीसही घटनास्थळी पोहोचले व आरोपीला ताब्यात घेतले.अटक केलेला आरोपी मुस्तफा मकबूल चौहान (१९) हा एसी दुरुस्तीचे पूर्वी काम करायचा. त्याचा साथीदार साहिल मकबूल मुन्शी याचा नयानगर पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी