शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

हळदीविरोधात ३३ गावांचा ठराव

By admin | Updated: February 26, 2016 04:25 IST

कल्याण परिसरातील ३३ गावांतील कोळी समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे लग्न समारंभामधील हळदीतील मद्यपानासह जेवणावळीवरील भपकेबाजपणाला आळा घालण्यासाठी

- अरविंद म्हात्रे, चिकणघरकल्याण परिसरातील ३३ गावांतील कोळी समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे लग्न समारंभामधील हळदीतील मद्यपानासह जेवणावळीवरील भपकेबाजपणाला आळा घालण्यासाठी ठराव करून वायफळ उधळपट्टी थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी (२३ फेब्रुवारी) अटाळी येथे झालेल्या कोळी समाजाच्या चावडी सभेमध्ये हा ठराव संमत केला असून कोळी समाजातून या सुधारणेचे स्वागत होत आहे.कोळी समाजातील लग्न समारंभ, हळदी समारंभ आणि साखरपुडा समारंभ यासाठी अनावश्यक पैशांची उधळपट्टी केली जाते. अनेकदा कर्ज काढून भपकेबाजपणाची हौस भागवली जात आहे. श्रीमंतांचे अनुकरण गरीबवर्गाकडूनही केले जात असल्याने समाजातील गरीबवर्ग कर्जबाजारी होत आहे. समाज प्रगतीला बाधक ठरणाऱ्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत रूढी न बदलता त्यातील भपकेबाजपणाला आळा घालण्यासाठी सभेत काही निर्णय घेण्यात आले.साखरपुडा वाजतगाजत न करता साध्या पद्धतीने करावा. हळदी समारंभात आॅर्केस्ट्रा आणि डीजेवर नियंत्रण आणण्याबरोबर मद्यपान सक्तीने बंद करावे. हे सर्व समारंभ साध्या पद्धतीने करून होणाऱ्या सामाजिक बचतीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करावा. हे समारंभ साधेपणाने करणाऱ्या समाजबांधवांचा सामाजिक सत्कार करण्यात येणार असल्याचेही ठरावात नमूद केले आहे.आम्ही मांडा आणि वडवली गावांत यापूर्वी हळदी समारंभात हरिपाठ आणि भजन-कीर्तन ठेवून भपकेबाजपणाला मुरड घातली आहे. याचे समाजाने अनुकरण करायला हवे.- हभप वासुदेव पाटील, वडवली, तालुका कल्याण समारंभात अनावश्यक खर्च करण्याऐवजी तो मुलांच्या शिक्षणासाठी खर्च झाला तरी चालेल. कारण, यामुळे सामाजिक विकास घडून समाज सुधारण्यास मदत होईल.- नारायण पाटील, अध्यक्ष कोळी समाज, कल्याण तालुका