शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या पोषण आहारावर १५३ कोटींचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 04:26 IST

कोरोनाच्या नावाने निधीत कपात; महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

- नारायण जाधव ठाणे : कोरोनाकाळात नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध सरकारांकडून विशेष पॅकेजसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने नवे पॅकेज देणे सोडाच; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाशी लढा देत असलेल्या राज्याच्या आदिवासी भागांतील गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या अमृत पोषण आहारासाठीच्या अनुदानावरच डल्ला मारला आहे.कोरोनाच्या नावाने वित्त विभागाच्या अटींचे कारण पुढे करून या आहारासाठीचे अनुदान तब्बल १५३ कोटी २० लाख ४९ हजार रुपयांनी कमी केले आहे. यामुळे आदिवासी भागांतील कुपोषण कसे कमी होईल, असा प्रश्न रविवारच्या आदिवासी दिनी करण्यात येत आहे.राज्याच्या आदिवासी भागातील कु पोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आदिवासी भागातील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि एक ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार देण्यात येतो.तो दिल्यामुळे राज्यात एकेकाळी ४५ टक्क्यांवर असलेले कुपोषणाचे प्रमाण ३४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्याचेच अनुदान आता ठाकरे सरकारने ७५ टक्क्यांनी कमी केले आहे.ठाणे-पालघर जिल्ह्यांना बसला मोठा फटकाचालू आर्थिक वर्षासाठी राज्यासाठी २०४ कोटी २७ लाख ३३ हजार रुपयांची भरीव तरतूद केली होती. यापैकी १७ कोटी दोन लाख २७ हजार अनुदान यापूर्वीच वितरित केले आहे. तर, आता ३४ कोटी चार लाख ५५ हजार अनुदान वितरित करण्यात आले आहे. याचा मोठा फटका आदिवासीबहुल असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही बसला आहे. ठाण्याला १२ कोटी १० लाखांपैकी तीन कोटी २५ लाख, तर पालघरला ३२ कोटी रुपयांपैकी आठ कोटी रुपये मिळाले आहेत.अमृत पोषण आहाराचा निधी कमी केला, हे जरी खरे असले तरी त्याचा फरक पडणार नाही. शासनाने ठाणे जि.प.ला आधी जो निधी दिला आहे, त्यासह जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मातांना पोषण आहारासह बालकांना खजुराचा पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय, उत्पन्न वाढल्यानंतर उर्वरित निधी शासन टप्प्याटप्प्याने देणार आहे.- सुभाष पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, ठाणेसाडेसहा लाख बालकांचे कुपोषण निर्मूलन होईल कसे?राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील साडेसहा लाखांहून अधिक मुले आणि सव्वा लाख मातांना हा पोषण आहार देण्यात येतो. यात आशा कार्यकर्त्या-अंगणवाडीसेविकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शासनाकडून वेळेत अनुदान न मिळाल्याने त्या आधी पदरमोड करून वेळेत संबंधित माता आणि बालकांना हा आहार पोहोचवित असतात. परंतु महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या नावाने १५३ कोटींहून अधिक अनुदान कमी केल्याने कुपोषण निर्मूलन होईल कसे, असा प्रश्न करण्यात येत आहे.