शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात १५ कोटींच्या डाळींचा साठा जप्त

By admin | Updated: October 25, 2015 01:18 IST

येथील दहिसर मोरीत पावणेआठ कोटींच्या विविध प्रकारच्या डाळींचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तीन गोदामांवर छापा

ठाणे : येथील दहिसर मोरीत पावणेआठ कोटींच्या विविध प्रकारच्या डाळींचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तीन गोदामांवर छापा टाकून एकूण १ हजार ६९२ मेट्रीक टन रशिया-आॅस्ट्रेलिया येथील चिक पिस (तूरडाळ) आणि कॅनडा रेड मसूर आणि इतर कडधान्यांचा साठा जप्त के ला आहे. त्याची किंमत १५ कोटींहून अधिक असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मुंब्रा-पनवेल रोडवरील मेसर्स सिद्धिविनायक लॉजिस्टिक प्लॉट २०२ येथील तीन गोदामांत तूरडाळ व इतर कडधान्यांचा बेकायदेशीर साठा ठेवल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या आणि शिधावाटप अधिकारी रत्नदीप तांबे यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या तेथे छापा टाकून कारवाई केली. त्या वेळी त्या गोदामांमध्ये रशिया चिक पिस, होल तूर, आॅस्ट्रेलिया चिक पिस, कॅनडा रेड मसूर इत्यादी कडधान्यांनी भरलेल्या प्रत्येकी ५० किलोंच्या गोण्या आढळल्या असून त्यांचे वजन एकूण १ हजार ६९२ मेट्रीक टन आहे. हा सर्व साठा जप्त के ला असून त्याची किंमत १५ कोटी नऊ लाख ७१ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी शिधावाटप अधिकारी तांबे यांनी मेसर्स सरस्वती पल्सेसचे पवन अगरवाल, श्लोक ट्रेडर्स व धवल फुड्स प्रायव्हेट लि.चे अमित जाधव आणि आशीर्वाद अ‍ॅग्रोचे राहित खिलवाणी या तिघांविरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)