शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महासभेच्या पटलावर विकासकामांचे १०१ प्रस्ताव

By admin | Updated: January 20, 2016 01:56 IST

मागील तीन वर्षे बजेटच्या प्रतिक्षेत असलेल्या नगरसेवकांना बुधवारच्या महासभेच्या निमित्ताने काहीसे समाधान मिळणार आहे.

ठाणे : मागील तीन वर्षे बजेटच्या प्रतिक्षेत असलेल्या नगरसेवकांना बुधवारच्या महासभेच्या निमित्ताने काहीसे समाधान मिळणार आहे. या महासभेत गटार, पायवाटा, चौक सुशोभिकरण, रस्ते, नाल्यावर स्लॅब टाकणे, फुटपाथ, शौचालय दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, आरोग्य सेवा, शरद पवार स्टेडीयम, भाजी मंडई, दलित वस्ती सुधारणा निधी आदींसह तब्बल १०१ प्रस्ताव प्रथमच चर्चेसाठी पटलावर ठेवून प्रशासनाने नगरसेवकांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मागील तीन वर्षांपासून प्रभागातील रखडलेली कामे या निमित्ताने मार्गी लागणार आहेत. मागील तीन वर्षांपासून महापालिकेत घडलेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे आणि जकात गेल्यानंतर आलेल्या एलबीटीमुळे पालिकेची आर्थिक घडी संपूर्णपणे विस्कटलेली होती. कर्मचाऱ्यांचा पगार निघेल का नाही अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. ठेकेदारांचाही रांगा पालिकेत लागत होत्या. त्यात स्थायी समिती आणि महासभेत प्रभागातील कामे रखडल्याच्या मुद्यावरुन अनेक वेळा वादंग निर्माण झाले होते. बजेट मिळत नसल्याने काही नगरसेवकांनी आंदोलनेदेखील केली. विशेष म्हणजे मागील तीन वर्षे महासभेने मंजूर केलेले बजेटही अंतिम झाले नव्हते. मागील वर्षी तर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारच्या नव्या प्रकल्पांची घोषणा केली नव्हती. उलट पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने मालमत्ताकरासह अनेक बाबींवर कर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हे अंदाज पत्रक मंजूर होण्यासाठी सुद्धा सप्टेंबरचा महिना उजाडला. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. (प्रतिनिधी)